शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

Volkswagen Taigun ची नवीन एडिशन लाँच, फक्त २५ हजारांत होईल बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2023 19:10 IST

नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत. 

नवी दिल्ली : फोक्सवॅगनने एक नवीन मध्यम आकाराची (मिजसाइज) एसयूव्ही लाँच केली आहे, जी टायगन (Taigun) ची GT Edge Trail आवृत्ती आहे. या कारचे बुकिंग सुरू झाले आहे. ग्राहकांना २५ हजार रुपये टोकन रक्कम भरून कारचे बुकिंग करता येईल. नवीन Taigun मध्ये ट्रेल थीम ग्राफिक्स आणि रूफ रेल, क्रोम ग्रिल आणि फंक्शनल रूफ रेल आहेत. 

तसेच, कारमध्ये ब्लॅक डोअर आणि रेड टचसह ORVM देखील दिलेले आहेत. यासोबतच ही एसयूव्ही १६ इंच डिझायनर व्हील आणि मागच्या बाजूला ट्रेल बॅजसह येते. कारच्या इंटीरियरमध्ये काही कॉस्मेटिक अपडेट्स करण्यात आले आहेत. आतील बाजूस कारला 3D फ्लोअर मॅट्स, लेदर सीट कव्हर्स, ट्रेल बॅजिंग आणि कमी स्टीलचे पेडल्स देण्यात आले आहेत.

काय आहेत फीचर्स?फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या कारमध्ये १०.१ इंच टच इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस ऍपल कारप्ले, अँड्रॉइड ऑटो, वायरलेस चार्जर, अॅम्बियंट लाइटिंग, इलेक्ट्रिक सनरूफ, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल, मल्टीफंक्शनल स्टीयरिंग व्हील्स, TPMS आणि अॅक्टिव्ह सिलिंडर मॅनेजमेंट सिस्टम यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

इंजिन आणि किंमतTaigun GT Edge Trail Edition मध्ये १.5 लिटर, टर्बो-पेट्रोल इंजिन आहे. स्टँडर्ड मॉडेलमध्येही हेच इंजिन उपलब्ध आहे. त्याचे आउटपुट १४८bhp पॉवर आणि २५०Nm टॉर्क आहे. या इंजिनसह तुम्ही ६-स्पीड मॅन्युअल किंवा ७-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय निवडू शकता. या कारमध्ये अनेक ट्रॅक्शन मोड देखील देण्यात आले आहेत. याचबरोबर, या कारची किंमत १६.२९ लाख रुपये आहे, जी एक्स-शोरूमनुसार आहे.

टॅग्स :Volkswagonफोक्सवॅगनcarकारAutomobileवाहन