शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Video: 700 रुपयांत चिकूने थार मागितलेली; आनंद महिंद्रांनी असे सरप्राईज दिले की...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2024 14:23 IST

Trending Video Anand Mahindra: असे केले तर आमचे दिवाळे निघेल असे गंमतीशीर उत्तर आनंद महिंद्रांनी तेव्हा दिले होते.

डिसेंबरच्या अखेरीस आनंद महिंद्रा यांनी चिकू नावाच्या मुलाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. चिकूने ७०० रुपयांत थार मिळेल का असे विचारले होते. यावर महिंद्रा यांनी त्या व्हिडीओवर असे केले तर आमचे दिवाळे निघेल असे गंमतीशीर उत्तर दिले होते. या चिकुला काही थार मिळाली नाही, परंतु महिंद्रांनी असे काही केले की ते पाहून तुम्हालाही आदर वाटेल.

या मुलाचा व्हिडीओ आनंद महिंद्रांना त्यांच्या एका निकटवर्तीयाने पाठविला होता. यावर आनंद महिंद्रांनी या चिकुचे इन्स्टावरील अन्य व्हिडीओ देखील पाहिले आणि ते त्याच्या प्रेमातही पडले होते. परंतु, आनंद महिंद्रा चिकुला ७०० रुपयांत कार देणार का? असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात होता. महिंद्रांनी थार दिली नाही परंतु त्या चिमुकल्याला जिथे थार बनते त्या महिंद्रा कंपनीचा अख्खा प्लांट फिरवून दाखविला आहे. 

महिंद्रांनी दिलेले हे सरप्राईज चिकू काही आयुष्यभर विसरू शकणार नाहीय. चिकू महिंद्राच्या प्लांटमध्ये फिरतानाचा व्हिडीओ महिंद्रा यांनी एक्स अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओत चिकूचा आधीचा ७०० रुपयांत थार देण्याचा व्हिडीओ जोडण्यात आला आहे. यानंतर चिकू महिंद्रा कंपनीच्या गेटवर आल्याचा आणि नंतर कंपनीत मौजमस्ती करतानाचा व्हिडीओ आहे. 

चिकू चाकणच्या महिंद्राच्या प्लांटमध्ये गेला होता. आमच्या सर्वोत्तम ब्रँड ॲम्बेसेडरपैकी एक होस्ट केल्याबद्दल @ashakarga1 आणि टीम @mahindraauto चे धन्यवाद! असे म्हणत आतातरी चिकू त्याच्या वडिलांना ७०० रुपयांना थार विकत घ्या असे म्हणणे थांबवेल, असे म्हणाले आहेत. या व्हीडिओत चिकू ७०० रुपयांत थार घेऊ शकत नाही, पण पाहू तर शकतो, असे बोलताना दिसत आहे. 

टॅग्स :Mahindraमहिंद्राAnand Mahindraआनंद महिंद्रा