शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

कार किंवा बाईकचं RC हरवलंय?, घरबसल्या करता येणार अर्ज; पाहा सोप्या स्टेप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2021 14:54 IST

Vehicle RC Book/Card : तुमच्या वाहनाचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC) हे गाडीचं अत्यंत महत्त्वाचं दस्तऐवज आहे.

तुमच्या वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र (RC) हा एक अतिशय महत्त्वाचा दस्तऐवज आहे. ड्रायव्हिंग लायसन्सप्रमाणेच, वाहन चालवताना नोंदणी प्रमाणपत्र नेहमी तुमच्यासोबत असले पाहिजे. या प्रमाणपत्राचा अर्थ असा आहे की तुमचे वाहन तुमच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात (RTO) नोंदणीकृत आहे. हे प्रमाणपत्र एकतर पुस्तक (RC Book) किंवा स्मार्ट कार्ड (RC Card) स्वरूपात असते.

कधी अनावधानानं आरसी आपल्याकडून हरवतं किंवा खराब होतो. अशावेळी आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या घरच्या सहजरित्या डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकता. मात्र, अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. केव्हाही आरसी हरवलं किंवा खराब झालं तर त्याची त्वरित पोलीस ठाण्यात तक्रार करा. प्रादेशिक परिवहन कार्यालयालादेखील यासंदर्भात लेखी कळवा. ज्या ठिकाणाहून तुम्हाला आरसी जारी करण्यात आलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लेखी कळवावं लागेल.

त्यानंतर त्याच आरटीओमध्ये डुप्लिकेट आरसीसाठी तुम्हाला फॉर्म २६ भरावा लागेल. याशिवाय त्यासाठी मोटर वाहन नियम १९८९ च्या नियम ८१ मध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य शुल्क भरावं लागेल. यासाठी तुम्हाला फॉर्म २६ अॅप्लिकेशन, पोलीस सर्टिफिकेट, पीयुसी, व्हॅलिड इन्शूरन्स, पत्त्याचा पुरावा, कोणतंही पेंडिंग चलान नसावं, पॅन कार्डाची कॉपी, आरसी हरवल्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र अशा काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

डुप्लिकेट आरसीसाठी काय कराल?तुम्हाला डुप्लिकेट आरसीसाठी अप्लाय करताना https://parivahan.gov.in/parivahan//en या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. त्यानंतर Online Services या ऑप्शनवर जाऊन vehicle-related services यावर क्लिक करावं लागेल. ज्या राज्यात वाहन रजिस्टर आहे ते निवडावं लागेल. राज्य निवडल्यानंतर त्या ठिकाणच्या Duplicate RC online या ऑप्शनला निवडा. त्या ठिकाणी आलेला फॉर्म भरा आणि ऑटो जनरेटेड डिटेल्स व्हेरिफाय करा.याशिवाय शुल्कही ऑनलाईन भरता येईल. तुमचं वाहन कोणत्या कॅटेगरीतील आहे यावर शुल्क निश्चित केलं जाईल. त्यानंतर एक रिसिट जनरेट होईल, ती तुम्हाला तुमच्या कागदपत्रांसोबत ट्रान्सपोर्ट ऑथोरिटीच्या कार्यालयात जमा करावी लागेल.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसIndiaभारत