शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग करताना मोबाईलचा वापर करणे घातक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2017 18:00 IST

ड्रायव्हिंग करताना मोबाईल वापरणे हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच... अशा थाटात सध्या अनेकजण वावरत असतात. एक मात्र खरे की मोबाईलचा वापर करू नका सांगणारी व्यक्ती मोबाईल वापरणाऱ्याच्या असंतोषाची जनक व्हायची.

ठळक मुद्देफोनवर बोलणारा माणूस कितीही कुशल कारचालक असला तरी तो माणूस असतो, त्याला भावना असतातत्यामुळे फोनवर होणारे संभाषण कशा प्रकारे होत असेल व त्याचे पडसाद कार चालवताना कशा प्रकारे पडू शकतील, याचा काहीही नेम नसतो

कारमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक प्रकारचे बदल होत गेले. त्यात म्युझिक सिस्टिममध्येच व स्टिअरिंग व्हीलवर काही नियंत्रण दिली गेली. त्यात मोबाईल फोनचेही नियंत्रण दिले गेले. मुळात हॅण्ड्सफ्री म्हणून जरी ते साधन उपलब्ध करून देण्यात आले असले तरीही मोबाईलचा वापर कार चालवताना ड्रायव्हरने करणे हीच मुळात कायद्याचे उल्लंघन करणारी बाब आहे. ते कोणीही लक्षात कसे घेत नाही, हा आश्चर्याचा भाग म्हणाला पाहिजे. कार वा वाहन चालवताना मोबाईल अर्थवटपणे कानाला लावून संभाषण करणे,कानात ब्लुटूथद्वारे संभाषण करणे किंवा म्युझिक सिस्टिममध्ये असलेल्या अन्य सुविधांच्या आधारे मोबाईलवर संभाषण हेच चुकीचे आहे. 

फोनवर बोलणारा माणूस कितीही कुशल कारचालक असला तरी तो माणूस असतो, त्याला भावना असतात. त्यामुळे फोनवर होणारे संभाषण कशा प्रकारे होत असेल व त्याचे पडसाद कार चालवताना कशा प्रकारे पडू शकतील, याचा काहीही नेम नसतो. प्रत्येक कार चालकाने, मालकाने इतकेच काय तर भाड्याच्या कारमधून जाणाऱ्या प्रवाशानेही लक्षात ठेवून कार चालवत असताना मोबाइलवर बोलणाऱ्या चालकाला तेथल्या तेथे ते बंद करायला सांगितले पाहिजे.मोबाईल ही सुविधा संपर्क साधण्यासाठी आहे. पण त्यासाठी तुम्ही तुमची कार वा वाहन एकतर रस्त्याच्या बाजूला न्या, थांबवा व मगच त्यावर संभाषण करा. अनेकदा तसे न करणारी ड्रायव्हर्सची टक्केवारी पाहिली तर साठ टक्क्यांपेक्षा जास्त ड्रायव्हर्स हे मोबाईल फोनचा वापर ड्रायव्हिंग करताना सर्रास करीत असल्याचे दिसेल वा आढळेल. तो ड्रायव्हर गाडीचा मालक असो की पगारी त्याने वाहन चालवताना असे संभाषण करणे म्हणजे स्वतःबरोबर अन्य लोकांच्या प्राणालाही धोक्यात घालण्यासारखे आहे. दुर्दैवाने अजूनही मोबाईलवर बोलणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली गेली असल्याचे दिसत नाही.मोबाईलचा अतिरेकी वापर हा त्याही पलीकडे गेला आहे. जीपीएस प्रणाली वापरण्यासाठीही मोबाईल काचेला अडकवून ड्रायव्हिंग करणारे अनेकजण दिसू लागले आहेत. काळ्या काचेच्या आत ड्रायव्हर मोबाईलवर बोलताना आजही दिसतात. मुळात अशा प्रकारचे कृत्य हे केवळ मोबाईलवर बोलणाऱ्याच्याच नव्हे तर अन्य वाहने, पादचारी यांच्यादृष्टीनेही विघातकच म्हटले पाहिजे.

आंबोली या हिलस्टेशनवर कावळे साद पॉइंटला दोन मद्यधुंद तरुणांचा दरीत पडून झालेला मृत्यू ही घटना देखील या मोबाईल वापरणाऱ्यांच्या व्यक्तिमत्त्वाशी जवळीक साधणारी आहे, असे म्हणावे लागते. अनेकदा मोबाईल वापरून कार चालवणाऱ्याला सांगायला गेले तर ते लोक वसकन तुमच्याच अंगावर ओरडतील, व कोण मला कशाला शिकवतो, अशा थाटात ते नजर देतील. आपण कार चालवताना, दुचाकी चालवताना मोबाईल वापरणे हे चुकीचे घातक कृत्य करीत आहोत, याची त्यांना सुतराम जाणीव नसते.

मोबाईल ड्रायव्हिंग करताना वापरणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे,अशा ठाम विश्वासामध्ये असे अनेक वाहन चालक आज वावरत आहेत. तेव्हा प्रत्येकाने अशा वाहन चालकांच्या असंतोषाचे 'जनक' बनण्यापासून सावधान... इतकेच म्हणू शकतो.कदाचित मोबाईलधारक आपल्या अधिकाररक्षणासाठी चांगले सांगणाऱ्यावरच खटला भरायचा, अशीही वेळ येईल की काय याचीच आता भीती वाढू लागली आहे.

टॅग्स :carकारAutomobileवाहनMobileमोबाइल