देशात सब कॉम्पॅक्ट एसयुव्ही सेगमेंटला जबरदस्त पसंती मिळू लागली आहे. नुकतीच लाँच झालेली निस्सानची मॅग्नाईट, ह्युंदाई व्हेन्य़ू, किया सोनेट हे ताजे उदाहरण आहे. आता आणखी एक नवीन कॉम्पॅक्ट एसयुव्ही भारतीय रस्त्यांवर धावण्यास सज्ज झाली आहे. होय, रेनो इंडियाने (Renault India) कायगर (Kiger) सादर केली आहे.
रेनो ही फ्रान्सची कार निर्माता कंपनी आहे. ही कार नोव्हेंबर 2020मध्ये पहिल्यांदा लाँच झाली होती. ही नवीन कायगर कार पहिल्या तिमाहीत भारतात लाँच होईल. डस्टर, क्विड आणि ट्रायबरच्या यशानंतर रेनोने नवीन श्रेणीमध्ये पाऊल ठेवले आहे. अंतर्गत भागात स्मार्ट केबिन देण्यात आली आहे. टर्बोचार्ज 1.0 लिटर पेट्रोल इंजिन, मल्टी सेन्स ड्राईव्ह मोड्स देण्यात आले आहेत. सिग्नेचर फ्रंट मेन ग्रिलची स्टाईल पाहून असे वाटते की, ही कार लोकप्रिय क्विडवरून बनविण्यात आली आहे.
Kiger एसयूव्ही Renault च्या मॉड्यूलर CMF-A+ प्लॅटफॉर्मवर बनविण्यात आली आहे. या कारची साईज निस्सानच्या मॅग्नाईटसारखीच असणार आहे. मॅग्नाईटची लांबी 3994 mm, रुंदी 1758 mm आणि उंची 1572 mm आहे. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक 205 mm चा ग्राऊंड क्लिअरन्स मिळतो. Renault Triber ही सात सीटर कार सर्वात स्वस्त कार म्हटले जात होते. मात्र, Nissan Magnite ने हा किताब काढून घेतला आहे. Renault Kiger ही ती कॉम्पॅक्ट एसयुव्ही असणार आहे. ही कार भारतातील सर्वात स्वस्त कॉम्पॅक्ट एसयुव्ही असण्याची शक्यता आहे. कारण या कारचीही किंमत 5 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. ही कार या सेगमेंटमधील सर्वात छोटी असली तरीही मायक्रो किंवा मिनी एसयुव्ही म्हटले जाणार नाही. कारण या कारची साईज ४ मीटरपेक्षा छोटी असणार नाही.
रेनॉ कायगरचा मुकाबला मारुती ब्रेझा, ह्युंदाई व्हेन्यू, टाटा नेक्सॉन, महिंद्रा XUV300 आणि किया सोनेटशी असणार आहे. Kiger मध्ये स्प्लिट LED headlamps आणि LED DRLs आहेत. Kiger मध्ये नवीन डॅशबोर्ड देण्यात येणार आहे. तसेच सनरुफही असण्याची शक्यता आहे. या कारची किंमत 5 ते 9.50 लाख एक्सशोरुम असण्याची शक्यता आहे.