बाजारपेठेत इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, टीव्हीएसने बाजारात मोठा धमाका केला. कंपनीने त्यांची नवी इलेक्ट्रीक स्कूटर टीव्हीएस ऑर्बिटर लॉन्च केली आहे. स्टायलिश डिझाइन असलेली ही स्कूटर शक्तिशाली रेंज आणि प्रगत वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. दरम्यान, परवडणाऱ्या किंमतीत इलेक्ट्रीक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली संधी आहे.
टीव्हीएस ऑर्बिटर ही भारतातील कंपनीची तिसरी इलेक्ट्रिक स्कूटर आहे. कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर १५८ किमीपर्यंत धावेल. या स्कूटरची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ९९ हजार ९०० रुपये ठेवण्यात आली आहे. ऑनलाइन बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे असून ग्राहकांना ही स्कूटर ६ रंगांच्या पर्यायांसह उपलब्ध आहे.
दमदार फीचर्स
या इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये क्रूझ कंट्रोल, हिल होल्ड फंक्शन आणि रिव्हर्स पार्किंग असिस्ट यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळत आहेत. शिवाय, यात यूएसबी चार्जिंग, ओटीए अपडेट्स आणि स्मार्टफोन अॅप कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स जोडण्यात आली आहेत.
कोणाशी स्पर्धा?
कंपनीने विशेषतः बजेट सेगमेंटसाठी टीव्हीएस ऑर्बिटर लॉन्च केली आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या एथर रिझ्टा, ओला एस१एक्स, विडा व्हीएक्स२ आणि बजाज चेतक सारख्या स्कूटरशी थेट स्पर्धा करेल.