शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

TVS Motorकडून ब्रिटनच्या Norton Motorcyclesची खरेदी; बनवणार 1000 ccच्या जबरदस्त बाइक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2020 16:12 IST

नॉर्टन मोटारसायकल ब्रिटनमधली एक मोठी आणि प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी आहे...

नवी दिल्ली: देशातील आघाडीची टू-व्हीलर कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटरने (टीव्हीएस मोटर) 122 वर्षांची जुनी Norton Motorcycles ही ब्रिटिश कंपनी 153 कोटी रुपयांत खरेदी केली आहे. नॉर्टन हा एक ब्रिटिश ब्रँड असून, तो जगभरात प्रसिद्ध आहे. त्यामुळे आता भारतातही Commando, Dominator आणि V4 RRसारख्या शक्तिशाली बाइक सहज उपलब्ध झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नॉर्टन मोटारसायकल ब्रिटनमधली एक मोठी आणि प्रसिद्ध बाईक निर्माता कंपनी आहे, परंतु अलीकडील काळात कंपनी अडचणींचा सामना करत आहे. कंपनीकडे रोखीची समस्या असल्यानं तिला अनेक ऑर्डर पूर्ण करता आलेल्या नाहीत. त्याचवेळी कंपनीचे आधीचे मालक स्टुअर्ट गार्नर यांच्यामागेसुद्धा कथित फसवणुकीच्या अनेक प्रकरणांमध्ये चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. टीव्हीएसने एका निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने आपल्या परदेशी सहाय्यक कंपनीमार्फत नॉर्टन मोटरसायकल (ब्रिटिश) लिमिटेडची खरेदी केली आहे. जीबीपी 16 मिलियन (सध्याच्या भारतीय चलनात 153 कोटी रुपयांत)मध्ये हा करार झाला आहे. Norton Motorcyclesची खरेदी केल्यानंतर येत्या काळात टीव्हीएसच्या जबरदस्त बाइक बाजारात पाहायला मिळणार आहेत. 

टीव्हीएसने निवेदनात म्हटले आहे की, येत्या काळात ऐतिहासिक मोटारसायकल ब्रँडची मागणी अधिक  वाढणार असून, टीव्हीएस मोटर कंपनी आंतरराष्ट्रीय दुचाकी बाजारात वेगानं वाढेल. तसेच भारताच्या विकासात खांद्याला खांदा लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही प्रगती करणार आहोत. टीव्हीएसने बीएमडब्ल्यू मोटोर्राडबरोबर करार केलेला असून, बीएमडब्ल्यू जी 310 आर आणि बीएमडब्ल्यू जी 310 जीएसचं उत्पादन टीव्हीएस प्लांटमध्येच केले जात आहे. तसेच टीव्हीएसचे स्वतःचे मोटरसायकल आधारित प्लॅटफॉर्म टीव्हीएस TVS Apache RR 310 देखील उपलब्ध आहे.