शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Traffic Rule: चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 13:32 IST

सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते.

वाहतुकीचे नियम एवढे आहेत की सगळेच मोडत बसलात तर एक दिवस गाडी विकून त्यांचा फाईन भरावा लागेल. काही नियम हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, काही इतरांच्या. परंतू ते पाळले नाहीत तर अपघात हे होतात. वाहतूक पोलीस आता बहुतांश पावत्या या सीसीटीव्ही कॅमेरे पाहून घरीच पाठवतात. परंतू, अनेकदा ते वाहतुकीचे नियमन करता करता गाड्या अडवून तपासणीही करतात. 

सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते. ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा तुम्हाला सळ्यांच्या मागे टाकू शकतो. यामध्ये सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे. 

दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यांमुळे बहुतांश अपघात होतात, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. दारु पिऊन किंवा अन्य कोणत्याही अंमलाखाली वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 185 नुसार दारु पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. ड्रंक ड्राईव्ह करताना पकडले गेल्यास १० हजार ते १५ हजार रुपयांचा दंड आहे. २०१९ पूर्वी तो २००० रुपये होता. 

पहिल्या वेळी पकडले गेल्यास १०००० रुपयांचा दंड किंवा ६ महिन्यांची कैद होऊ शकते. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास १५००० रुपयांचा दंड आणि दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तर त्यानंतर पुन्हा पकडला गेल्यास लायसन्सच रद्द होऊ शकते. मद्यपान करून वाहन चालविताना सापडल्यास पावती फाडून तुमची कार-स्कूटर ताब्यात घेतली जाईल. हा दंड भरल्यानंतरच तुमचे वाहन तुम्हाला परत केले जाईल. यासाठी वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन दंड भरावा किंवा ऑनलाईन दंड भरता येणार आहे. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस