शहरं
Join us  
Trending Stories
1
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
2
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
3
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
4
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
5
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
6
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
7
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
8
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
9
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
10
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
11
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
12
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
13
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
14
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
15
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
16
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
17
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
18
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
19
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
20
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'

प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2025 18:14 IST

टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरी हायब्रिडची 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च केली आहे.

भारतातील प्रीमियम सेडान सेगमेंटमध्ये आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरने आपली लोकप्रिय सेडान टोयोटा कॅमरी हायब्रिडची 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च केली आहे. ही नवीन आवृत्ती खास करून स्पोर्टी लूक आणि दमदार कामगिरीसाठी तयार करण्यात आली आहे.

काय आहे 'स्प्रिंट एडिशन'मध्ये खास?कॅमरीच्या या नवीन मॉडेलमध्ये ड्युअल-टोन डिझाइन देण्यात आले आहे. यात मॅट ब्लॅक रंगाचे हुड, रूफ आणि ट्रंक देण्यात आले आहे, जे कारला एक आक्रमक रूप देतात. याशिवाय, या कारमध्ये नवीन मॅट ब्लॅक अलॉय व्हील्स आणि स्पोर्टी किट देखील मिळते. गाडीला रात्रीच्या वेळी आणखी आकर्षक बनवण्यासाठी यात डोअर वॉर्निंग लॅम्प आणि अॅम्बियंट लाइटिंगही देण्यात आली आहे.

दमदार कामगिरी आणि मायलेजकॅमरी स्प्रिंट एडिशनमध्ये २.५-लीटर डायनॅमिक फोर्स इंजिन आहे, जे ई-सीव्हीटी गिअरबॉक्स आणि उच्च-क्षमतेच्या लिथियम आयन बॅटरीसोबत येते. हे हायब्रिड इंजिन एकूण २३० पीएसची पॉवर जनरेट करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही कार जवळपास २५.४९ किमी/प्रति लीटर मायलेज देते. चालकांना त्यांच्या गरजेनुसार इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्राइव्ह मोड मिळतात.

सुरक्षितता आणि लक्झरीचा संगमनवीन कॅमरी स्प्रिंट एडिशन सुरक्षिततेच्या बाबतीतही मागे नाही. यात टोयोटा सेफ्टी सेन्स ३.० तंत्रज्ञान आहे, ज्यात प्री-कोलिजन सिस्टीम, लेन डिपार्चर अलर्ट आणि डायनॅमिक रडार क्रूझ कंट्रोल सारखी फीचर्स आहेत. सुरक्षेसाठी यात ९ एअरबॅग्स, व्हेहीकल स्टेबिलिटी कंट्रोल आणि ३६०-डिग्री कॅमेरा देखील आहे. शिवाय, आरामदायक प्रवासासाठी यात १०-वे पॉवर सीट, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, पॅडल शिफ्टर्स, हेड-अप डिस्प्ले आणि वायरलेस चार्जर यांसारख्या लक्झरी सुविधा मिळतात.

टॅग्स :carकारAutomobileवाहन