जीएसटी कपातीच्या घोषनेनंतर टोयोटाने आपल्या कारवर जीएसटी कपातीची घोषणा केली आहे. यानुसार ग्लांझा ते इनोव्हा क्रिस्टापर्यंत 48,700 ते 3,49,000 रुपयांपर्यंत किंमत कमी करण्यात आली आहे. हे बदल २२ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
नवीन जीएसटी स्लॅब कमी केल्यानंतर, कार कंपन्या त्यांच्या मॉडेल्सवरील किमतीत कपात जाहीर करत आहेत. आतापर्यंत टाटा आणि ह्युंदाईने आपल्या कारचे दर कमी केले आहेत. मारुतीची प्रतिक्षा असली तरीही मारुतीसोबत प्लॅटफॉ़र्म शेअर करत एकमेकांच्या कार नावे बदलून विकणारी कंपनी टोयोटाने आपल्या कारवरील जीएसटी दर कमी केले आहेत.
यानुसार ग्लांझा 85,300 रुपयांपर्यंत स्वस्त करण्यात आली आहे. क्रॉसओवर एसयूवी अर्बन क्रूजर टाइजरची किंमत 1.11 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. एमपीवी रूमियनची किंमत 48,700 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. हायरायडरची किंमत 65,400 रुपयांपर्यंत, इनोव्हा क्रिस्टाची किंमत 1,80,600 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे.
इनोव्हा हायक्रॉसची किंमत 1,15,800 रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. प्रीमियम सेदान कॅम्रीची किंमत 1,01,800 रुपयांपर्यंत कमी झाली असून फॉर्च्यूनरची किंमत सर्वाधिक कमी म्हणजे 3.49 लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. टोयोटा फॉर्च्यूनर लीजेंडरची किंमत 3.34 लाख आणि हायलक्सची किंमत 2,52,700 रुपयांनी स्वस्त झाली आहे.