शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Car Discount Offers : 'या' कार खरेदी केल्यास होईल 50 हजारांपर्यंतचा फायदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 13:52 IST

Car Discount Offers : वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत.

नवी दिल्ली : देशात सणांचा हंगाम सुरू झाला आहे. यामध्ये नवरात्री आणि दिवाळी हे प्रमुख सण आहेत. या सणानिमित्त लोकांना नवीन वाहने खरेदी करायला आवडतात. हे लक्षात घेऊन वाहन उत्पादकांनी आपल्या वाहनांची विक्री वाढवण्यासाठी आकर्षक सवलती आणि इतर ऑफर सुरू केल्या आहेत.

जर तुम्हीही नवीन कार घेण्याचा विचार करत असाल किंवा तुम्हाला नवीन कारवर मिळणाऱ्या डिस्काउंट ऑफरबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर आम्ही तुम्हाला 5 लाखांच्या बजेटमध्ये येणाऱ्या चार कारची माहिती सांगत आहोत. या कारच्या खरेदीवर तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत फायदा मिळू शकतो.

Maruti S Pressoमारुती एस्प्रेसो ही एक मायक्रो एसयूव्ही आहे, जी तुम्ही नवरात्रीच्या सणासुदीच्या काळात खरेदी केल्यास तुम्हाला 49,000 रुपयांपर्यंत फायदा होऊ शकतो. मारुती सुझुकी या एसयूव्हीवर वेगवेगळ्या व्हेरिएंटनुसार सूट देत आहे. जर तुम्ही मारुती एस्प्रेसोचे मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिएंट विकत घेतले तर तुम्हाला 49 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते आणि जर तुम्ही या एसयूव्हीचे ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंट खरेदी केले तर तुम्हाला 34 हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. मारुती एस्प्रेसोची सुरुवातीची किंमत 4.25 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर 5.99 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.

Renault Kwidरेनॉल्ट क्विड ही हॅचबॅक सेगमेंटमधील कार आहे. या कारची आकर्षक डिझाईन, फीचर्स आणि मायलेजमुळे मार्केटमध्ये चांगली विक्री होत आहे. या फेस्टिव्ह सीझनमध्ये तुम्ही रेनॉल्ट क्विड खरेदी केल्यास तुम्हाला 35 हजार रुपयांपर्यंत नफा होऊ शकतो. रेनॉल्ट या हॅचबॅकवर देत असलेल्या सवलतींमध्ये 10 हजार रुपयांची रोख सवलत, कॉर्पोरेट सूट 10 हजार रुपये आणि एक्सचेंज बोनस 15 हजार रुपयांचा आहे. रेनॉल्ट क्विडचे बेस मॉडेल 4,64,400 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पासून सुरू होते आणि टॉप व्हेरिएंटमध्ये 5,99,000 रुपयांपर्यंत जाते.

Maruti Alto 800मारुती अल्टो ही देशातील सर्वात स्वस्त एंट्री लेव्हल हॅचबॅक कार आहे, जी खरेदी केल्यावर तुम्हाला 29,000 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. ही सवलत ऑफर या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे. मारुती अल्टो स्टँडर्डची सुरुवातीची किंमत 3,39,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये, अल्टोची किंमत 5,03,000 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.

Hyundai Santroह्युंदाई सॅन्ट्रो ही हॅचबॅक सेगमेंटमधील कंपनीची सर्वात जुनी आणि लोकप्रिय कार आहे. सध्या तुम्ही ही कार खरेदी केली तर तुम्हाला 28,000 रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. कंपनीची ही सूट या कारच्या सर्व व्हेरिएंटवर लागू आहे. ह्युंदाई सॅन्ट्रोची सुरुवातीची किंमत 4,89,700 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे आणि या कारची किंमत टॉप व्हेरिएंटमध्ये 6,41,600 रुपये आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहन