शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

यावेळचा ऑटो एक्स्पो ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ रोजी नोएडात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 19:19 IST

ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते

ठळक मुद्देदर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असतेमोटार उत्पादक कंपन्या या आपल्या उत्तमोत्तम भावी मोटारी या प्रदर्शनामध्ये लोकांसमोर मांडत असतातमोटार कंपन्यांच्या मोटारींमध्ये जणू एक सौदर्यस्पर्धाच असावी, असा तो सोहळा असतो

ग्रेटर नोएडामध्ये इंडिया एक्स्पो मार्च येथे ९ ते १४ फेब्रुवारी २०१८ या काळात ऑटो एक्स्पोमधील मोटर शो आयोजित करण्यात आला आहे. दर दोन वर्षांनी दिल्लीमध्ये होणारा हा ऑटो एक्स्पो म्हणजे वाहनप्रेमींसाठी व शौकिनांसाठी एक पर्वणी असते. मोटार उत्पादक कंपन्या या आपल्या उत्तमोत्तम भावी मोटारी या प्रदर्शनामध्ये लोकांसमोर मांडत असतात. मोटार कंपन्यांच्या मोटारींमध्ये जणू एक सौदर्यस्पर्धाच असावी, असा तो सोहळा असतो. आशियामधील सर्वात मोठा असा मानला जाणारा व जगामधील दुसऱ्या क्रमांकाचाही ठरलेला हा ऑटो एक्स्पो आहे. हा १४ वा ऑटो शो आहे. १९८६ पासून सुरू झाला. येत्या ऑटो अक्स्पोचे उद्घाटन ८ फेब्रुवारीला होणार आहे.

यामध्ये कम्पोनंटस् म्हणजे सुटे भाग, तंत्रज्ञान याचाही एक वेगळा नमुना असतो. हा कम्पोनंट्स बाबतचा शो मात्र दिल्लीत प्रगती मैदानामध्ये ८ ते ११ फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे. विविध कंपन्या या ऑटो एक्स्पोमध्ये सहभागी होत असतात. या आधी २०१२ पर्यंत दिल्लीमधील प्रगती मैदानात हा ऑटो एक्स्पो होत असे. आता तो ग्रेटर नोएडामध्ये होतो.वाहन उत्पादकांच्या SIAM एसआयएएम या संघटनेने या येत्या ऑटो एक्स्पोची घोषणा केली आहे. सध्या भारताच्या सरकारची नजर वीजेवरील वाहनांच्या (ईसीव्ही)वापरासाठी वळत आहे. पुढील काळात इलेक्ट्रिक वाहनांबाबत सध्या केंद्राने मांडलेली भूमिका लक्षात घेता या ऑटो एक्स्पोमध्ये त्याचे काय पडसाद उमटतात, कोणती तशा प्रकारची नवी वाहने मांडली जातात, हा भाग यावेळच्या प्रदर्शनामधीलही आकर्षणाचा ठरणार आहे.

१ लाख ८५ हजार चौरस मीटर क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष हा ऑटो शो होणार असून तो नोएडामध्ये असेल तर कंपोनंट्स शो हा यावेळी 'जगाला वाहून नेणारे वाहन तंत्रज्ञान' या संकल्पनेवर आधारित आहे. ६० हजार चौरस मीटर इतक्या क्षेत्रात प्रगती मैदानामध्ये ते होणार आहे.जगभरातील १२०० कंपन्या या कंपनोनंट्स शोमध्ये सहभागी होणार आहे. एसीएमए,एसआयएएम, सीआयआय व ओआयसीए यांनी हा संपूर्ण ऑटो शो आयोजित केला आहे.

टॅग्स :Automobileवाहन