शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

इलेक्ट्रिक वाहनांची नुसतीच पोकळ ‘हवा’; रिपोर्टमधून इको फ्रेंडली नसल्याचं उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 05:36 IST

लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते

इलेक्ट्रिक गाड्या आपल्याला वाटतात तितक्या पर्यावरणपूरक, इको फ्रेंडली नसल्याचे समोर आले आहे. एका अहवालानुसार, एक इलेक्ट्रिक कारसाठी वापरण्यात येणारा कच्चा माल जमिनीतून काढताना ४,२७५ किलो ॲसिड कचरा आणि किरणोत्सर्गी अवशेष तयार होतात. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने खरेच फायद्याची आहेत का हे जाणून घेऊ...

इलेक्ट्रिक वाहनांमुळे काय होते नुकसान? ईव्हीमध्ये १३,५०० लिटर पाणी लागते, तर पेट्रोलमध्ये जवळपास ४ हजार लिटर पाणी असते. जर ईव्हीला कोळशावर चालणाऱ्या विजेवर चार्ज करून १.५ लाख किमी चालवल्यास पेट्रोल कारपेक्षा केवळ २० टक्के कमी कार्बन निर्माण होईल. भारतात ७० टक्के वीज कोळशापासून निर्माण होते. त्याचवेळी ऑस्ट्रेलियामध्ये केलेल्या संशोधनानुसार ३३०० टन लिथियम कचऱ्यापैकी केवळ २ टक्के पुनर्वापर केला जातो, तर ९८ टक्के प्रदूषण पसरवते. 

जमिनीला कसा बसतो फटका? लिथियम हा जगातील सर्वांत हलका धातू आहे. हे इलेक्ट्रॉन अगदी सहज सोडतात. यामुळे हे ईव्ही बॅटरीमध्ये वापरले जाते. लिथियमचा पर्यावरणपूरक म्हणून गौरव केला जातो; परंतु ते जमिनीतून काढून टाकणे पर्यावरणासाठी ३ पट जास्त विषारी आहे. 

सर्व गाड्या ईव्ही झाल्या तर प्रदूषण कमी होईल? संशोधकांच्या मते, जगात सुमारे २०० कोटी वाहने आहेत. यातील केवळ १ कोटी वाहने इलेक्ट्रिक आहेत. जर सर्व वाहने ईव्हीमध्ये रूपांतरित केली तर त्या गाड्या तयार करण्यासाठी जाणाऱ्या ॲसिड कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसी साधने नाहीत. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक वाढवून आणि खासगी गाड्या कमी करूनच हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करता येईल.

भारताचे लक्ष्य? २०३० पर्यंत ७० टक्के व्यावसायिक कार, ३० टक्के खासगी कार, ४० टक्के दुचाकी आणि ८० टक्के तीन चाकी वाहनांचे विद्युतीकरण करण्याचे केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी २०३० पर्यंत ४४.७ टक्के वीज अक्षय ऊर्जेपासून तयार केली जाईल, आता ती २१.२६ टक्के आहे.

लोकांना कशाची चिंता? 

चार्जिंग स्टेशन, चार्जिंगसाठी लागणारा वेळ, सुरक्षेची काळजी, कमी पर्याय, ब्रँडची उपलब्धता

 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कार