शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जागाच जागा! १३ सीटर Force Gurkha चा लूक लीक; कमाल डिझाइन अन् धाकड पावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 17:06 IST

फोर्स मोटर्स कंपनी सध्या आपल्या फोर्स गुरखाच्या नव्या मॉडेलवर काम करत आहे. सध्या गुरखा फक्त 3 डोअर मॉडेलमध्येच उपलब्ध आहे,

फोर्स मोटर्स कंपनी सध्या आपल्या फोर्स गुरखाच्या नव्या मॉडेलवर काम करत आहे. सध्या गुरखा फक्त 3 डोअर मॉडेलमध्येच उपलब्ध आहे, पण पुण्यात गुरखाचं नवं व्हर्जन पाहायला मिळालं आहे. गुरखाचं नवं मॉडेल ट्रॅक्स क्रूझरसारखेच असणार आहे. हे नवं मॉडेल पाहता हे लाँग व्हील बेस व्हर्जनवर उपलब्ध होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या नवीन व्हर्जनचा व्हील बेस आधीच्या व्हर्जनपेक्षा मोठा आहे.  

समोरून पाहिल्यास, ही नवी फाइव्ह डोअर गुरखा जुन्या थ्री डोअरसारखीच दिसते. नवी कार स्नॉर्कल, विंडस्क्रीन बार, रुफ रेल आणि मागील शिडीनं सुसज्ज आहे.

१३ लोक करु शकतील प्रवासटीम बीचएपीच्या रिपोर्टनुसार, या नवीन गुरखामध्ये १३ लोक एकत्र प्रवास करू शकतात. सीटबद्दल बोलायचं झाल्यास कारच्या रिअर सीट्समध्ये कॅप्टन सीट असण्याऐवजी त्यास बेंच सीटनं बदलण्यात आलं आहे. तर मागील भागात २ बाजूच्या बेंच सीट देण्यात आल्या आहेत.

२.६ लीटर डिझेल इंजिनटीम बीएचपीने आपल्या रिपोर्ट्समध्ये दिलेल्या माहितीनुसार यात २.६ लीटर डिझेल इंजिन दिलं जाऊ शकतं, जे ९० एचपी पॉवर आणि २५० एनएम पीक टॉर्क जनरेट करू शकते. यात 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. 4 व्हील ड्राइव्हचा पर्याय देखील असू शकतो.

महिंद्राच्या थारची थेट स्पर्धाफोर्स गुरखा कारची स्पर्धा महिंद्रा थार ऑफ रोड कारशी आहे. महिंद्रा थार बद्दल आज नवीन माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये पुढील वर्षीच्या ऑटो एक्सपो 2023 मध्ये महिंद्रा थार फाइव्ह डोअर व्हर्जन सादर करणार आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार नव्या गुरखा कारमध्ये १३ लोक बसू शकतील. मात्र, त्यामध्ये आणखी कोणती वैशिष्ट्ये असतील, त्यासाठी अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योग