शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

टेस्ला... सॅम अल्टमन बुक करून फसला; साडे सात वर्षे झाली डिलिव्हरीच मिळाली नाही, रिफंड तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 12:43 IST

टेस्लासारख्या कंपनीने एखाद्याला बुक करूनही सात-साडेसात वर्षे कारच डिलिव्हर केली नाही आणि पैसेही ढापले, असे जर तुम्ही वाचले तर ...

टेस्लासारख्या कंपनीने एखाद्याला बुक करूनही सात-साडेसात वर्षे कारच डिलिव्हर केली नाही आणि पैसेही ढापले, असे जर तुम्ही वाचले तर तुमचा विश्वास बसणार नाही. हा प्रकार कोणा ऐऱ्यागेऱ्यासोबत घडला नाहीय, तर जगाला भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणाऱ्या ओपन एआयच्या सॅम अल्टमनसोबत घडला आहे. 

आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रातील जागतिक कंपनी OpenAI चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. जगाला भविष्यातील तंत्रज्ञानाची ओळख करून देणारे अल्टमन स्वतः एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीच्या एका जुन्या बुकिंगमुळे त्रस्त आहेत. अल्टमन यांनी तब्बल साडेसात वर्षांपूर्वी (July 2018) टेस्लाची एक बहुप्रतिक्षित कार बुक केली होती, परंतु ही कार त्यांना अद्यापही मिळालेली नाही. अखेरीस, प्रतीक्षेला कंटाळून अल्टमन यांनी आता टेस्लाकडे आपली संपूर्ण रक्कम परत करण्याची मागणी केली आहे.

ईमेलही झाला 'बाउन्स'!सॅम अल्टमन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर करत आपला अनुभव सांगितला. त्यांनी 2018 मध्ये बुकिंगची पावती, रिफंडसाठी टेस्लाला पाठवलेला ईमेल आणि कंपनीच्या बाजूने आलेला 'बाउन्स बॅक' संदेश असे तीन स्क्रीनशॉट्स शेअर केले. "मी खरोखरच या कारसाठी उत्सुक होतो! आणि मला उत्पादन विलंबाची जाणीव आहे. पण साडेसात वर्षांचा हा काळ खूप जास्त वाटला.", असे अल्टमन यांनी सांगितले. 

नेमके कोणते मॉडेल बुक केले होते?अल्टमन यांनी नेमके कोणते मॉडेल बुक केले होते हे स्पष्ट नाही, पण 2018 मधील त्यांच्या $45,000 (सुमारे ₹37 लाख) च्या प्री-रिझर्व्हेशन रकमेवरून त्यांनी बहुप्रतिक्षित टेस्ला रोडस्टर (Tesla Roadster) ही इलेक्ट्रिक सुपरकार बुक केली असावी, असा अंदाज आहे. रोडस्टरचे उत्पादन अनेक वेळा पुढे ढकलण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tesla delays Sam Altman's car for 7 years; refund awaited.

Web Summary : OpenAI's Sam Altman booked a Tesla Roadster in 2018, but delivery remains unfulfilled after seven years. Altman seeks a refund after repeated delays. His emails to Tesla bounced back, prompting him to share his frustration online.
टॅग्स :Teslaटेस्लाelon muskएलन रीव्ह मस्कArtificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स