शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

'या' कारमध्ये देण्यात आलय अफलातून फीचर, फक्त एका टचमध्ये बदलेल हवा तो रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 15:27 IST

टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार्स अधिकाधिक चांगल्या बनविण्यासाठी सातत्याने नवनवे फीचर्स देत असते आणि यावेळी त्यांनी कारसोबत दिलेले एक फीचर फारच मनोरंजक आहे.

अमेरिकन इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी टेस्लाने जगतीक पातळीवर आपल्या नावाचा एक विशेष दबदबा निर्माण केला आहे. तसेच, एलोन मस्क (Elon Musk) हेही कोणत्याना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. सध्या त्यांच्या कंपनीच्या भारतात येण्यासंदर्भातही बरीच चर्चा सुरू आहे. टेस्ला आपल्या इलेक्ट्रिक कार्स अधिकाधिक चांगल्या बनविण्यासाठी सातत्याने नवनवे फीचर्स देत असते आणि यावेळी त्यांनी कारसोबत दिलेले एक फीचर फारच मनोरंजक आहे. या कारचे कलरलायझर कसे काम करते यासंदर्भात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत. 

कसे काम करते हे फिचर - टेस्लाच्या कारमध्ये देण्यात आलेल्या या कलरलायझरच्या सहाय्याने यूजर इंफोटेनमेंट स्क्रिनवर आपला आवडता रंग निवडू शकतात. यानंतर जेव्हा ड्रायव्हर इतर फीचर्स अथवा नेव्हिगेशनचा वापर करतो, तेव्हा त्याला निवडण्यात आलेल्या रंगात ही सर्व माहिती मिळते. हा रंग एका कलर व्हीलच्या सहाय्याने क्षणात अनेक रंगांमध्ये बदलला जाऊ सकतो. एवढेच नाही, तर इंफोटेनमेंट स्क्रीनचा बदललेला रंग आपल्या मनानुसार दीर्घकाळापर्यंत सेव्ह केला जाऊ शकतो. महत्वाचे म्हणजे, टेस्ला अॅपच्या सहाय्यानेही आपण या फिचरचा वापर करू शकता.

...तर कारही बदलते रंग?नाही, हे फीचर केवळ कॅबिनमध्ये टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टमसाठीच देण्यात आले आहे. या फीचरच्या माध्यमाने आपल्याला कारच्या बाहेरील भागाचा रंग बदलता येणार नाही. मात्र, बीएमडब्ल्यूने बाजारात अशी कार लॉन्च केली आहे, जी आपला रंग बदलते. 

कंपनीची आयएक्स एम60 फ्लो एक इलेक्ट्रिक कार आहे. ही कार ड्रायव्हरला हवा असलेला रंग बदलते. या कारच्या बाहेरील बाजूस ई-इंकचे कोटिंग करण्यात आले आहे. जे कोट्यवधी मायक्रो कॅप्सूलच्या सहाय्याने आपला रंग बदलते. एक बटन दाबताच या कारचे हे मायक्रोकॅप्सूल आपला रंग बदलतात.

टॅग्स :Teslaटेस्लाcarकार