शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

Tata Vs. Maruti भिडणार; एकाच दिवशी दोन्ही कंपन्या 'या' कार लाँच करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 16:31 IST

दोन स्पर्धक कंपन्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्याचे प्रसंग बऱ्याचदा घडलेले आहेत.

मुंबई : भारतीय बाजारपेठ काबीज करण्यासाठी आणि टिकविण्यासाठी देशाच्याच दोन कंपन्या एकमेकांना भिडणार आहेत. येत्या 23 जानेवारीला टाटा आणि मारुती या दोन्ही कंपन्या त्यांच्या कार लाँच करणार आहेत. यापैकी टाटाची कार ही नवी कोरी तर मारुतीचा कार ही सर्वात लोकप्रिय असलेली आहे. या स्पर्धेमुळे कोण भाव खाऊन जाणार हे या दिवशी स्पष्ट होणार आहे. 

दोन स्पर्धक कंपन्या एकमेकांविरोधात उभ्या ठाकल्याचे प्रसंग बऱ्याचदा घडलेले आहेत. काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅपलने माहिती असूनही वनप्लस मोबाईलच्या 6T लाँचिंगवेळीच अ‍ॅपलच्या आयपॅडचे लाँचिंग ठेवले होते. या दोन दिग्गज कंपन्या एकमेकांसोबत उभ्या ठाकल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात तणाव निर्माण झाला होता. कोण माघार घेणार, हा प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. अखेर वनप्लसने एक पाऊल मागे घेत लाँचिंग सोहळा एक दिवस पुढे ढकलला होता. अशीच काहीशी परिस्थिती आज भारताच्या दोन मोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये दिसत आहे. 

टाटा मोटर्सने हॅरिअरच्या लाँचिंगची तारिख दोन- तीन महिन्य़ांपूर्वीच ठरविली होती. त्यानुसार प्रसिद्धीमाध्यमांद्वारे बातम्याही दिल्या जात होत्या. हॅरिअर ही एसयुव्ही प्रकारातील गाडीही इंटरनेटवर चांगलीच ट्रेंड होत होती. मात्र, एवढे असूनही मारुतीने तिची 20 वर्षांपासून सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय असलेली कार वॅगन आरचे लाँचिंग ठेवले आहे. या दोन्ही कारची श्रेणी वेगवेगळी असली तरीही स्पर्धेमुळे कोणती कार झाकोळली जाणार आणि कोणत्या कारला झळाळी मिळणार याबाबत वाहनक्षेत्रात कमालीची उत्सुकता आहे. टाटाच्या हॅरिअरचे लाँचिंग मुंबईमध्ये होणार असून मारुतीच्या वॅगन आरचे लाँचिंग दिल्ली येथे करण्यात येणार आहे. 

टॅग्स :TataटाटाMaruti Suzukiमारुती सुझुकीMarutiमारुती