शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

Tata Tiago, Tigor CNG Car Launch: टाटाचा मारुतीला धोबीपछाड! ५० हजारांच्या फरकाने Tata Tiago CNG लाँच; मायलेज मात्र गुलदस्त्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 13:55 IST

Tata Tiago, Tigor CNG Car Launch Price, mileage: मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे. 

टाटा मोटर्सने बहुप्रतिक्षित टाटा टियागो सीएनजी (Tata Tiago CNG) आणि टाटा टिग़ॉर सीएनजी (Tata Tigor CNG) कार आज लाँच केली. मारुती सुझुकीने दोन दिवस आधीच सेलेरियो सीएनजी लाँच केली होती. त्यापेक्षा खूप कमी किंमतीत टाटाने टियागो सीएनजी लाँच करून धक्का दिला आहे. 

Tata Tiago iCNG ची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 6,09,900 रुपये आहे. तर सीएनजी मॉडेलचे टॉपएंड व्हेरिअंट 7,64,900 रुपयांपर्यंत जाते. टियागो सीएनजीची डिलरशीपकडे आधीच बुकिंग सुरु झाली आहे. टाटाने या कारमध्ये सेगमेंट फर्स्ट फिचर दिले आहेत. याशिवाय कंफर्ट आणि सेफ्टीकडेही लक्ष देण्यात आले आहे. टियागोचे एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड प्लस असे चार सीएनजी व्हेरिअंट असणार आहेत. 

Tata Tigor CNG ची किंमत 7.69 लाखांपासून सुरु होते. टिगॉर सीएनजी एक्सझेड आणि एक्सझेड प्लस असे दोन व्हेरिअंट उपलब्ध होणार आहेत. टाटाने अद्याप दोन्ही कारचे मायलेज किती याची माहिती दिलेली नाही. दोन्ही कारमध्ये ६० लीटरची सीएनजी टाकी देण्यात आली आहे. 

बाबो! एका किलोला ३५.६० किमीचे मायलेज; मारुती सेलेरियो सीएनजी लाँचभारतीय बाजारात सेलेरियोची किंमत 6.58 लाख रुपये एक्स शोरुम ठेवण्यात आली आहे. ही सीएनजी कार VXi व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. पेट्रोलच्या तुलनेत ही कार 45,000 रुपयांनी महाग आहे. यामध्ये K10C पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. मारुती सुजुकी सेलेरियो S-CNG मध्ये बसविण्यात आलेले इंजिन 5300 आरपीएम वर 41.7kW ची ताकद निर्माण करते. पेट्रोलचे इंजिन 5500 आरपीएमवर 48.0kW एवढी ताकद निर्माण करते. Maruti Suzuki Celerio मध्ये 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्स मिळतो. सीएनजीसाठी ६० किलोची टाकी देण्यात आली आहे.

टॅग्स :Tataटाटा