शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

TaTa Punch Launch Price: टाटा दोन दिवस आधीच ठोसा लगावणार; 18 ऑक्टोबरला Punch लाँच होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 17:58 IST

TaTa Punch Launch date, Expected Price: टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. या रेटिंग ग्लोबल एनकॅपने दिलेल्या आहेत. यात पंचचाही समावेश होण्याची शक्यता आहे.

टाटा नेक्सॉन, अल्ट्रॉझच्या निर्भेळ यशानंतर टाटा मोटर्स भारतीय बाजारात मायक्रो एसयुव्ही टाटा पंचचा (TaTa Punch) ठोसा लगावणार आहे. २० ऑक्टोबरला ही छोटी एसयुव्ही लाँच केली जाणार होती. परंतू कंपनीने दोन दिवस आधीच लाँच करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

काही दिवसांपूर्वीच Tata Punch या मायक्रो एसयुव्हीचे रिव्ह्यू यायला सुरुवात झाली आहे. तसेच अधिकृत बुकिंगही घेण्यास कंपनीने सुरुवात केली आहे. कंपनीने अद्याप या कारची किंमत जाहीर केलेली नाही. टाटा पंचची किंमतही सोमवारीच जाहीर होण्याची शक्यता आहे. टाटा पंचची अंदाजे किंमत ही 5.5 लाख ते 9 लाखांच्या आसपास असणार आहे. 

टाटाच्या ताफ्यात सध्या दोन फाईव्ह स्टार रेटिंगच्या कार आहेत. या रेटिंग ग्लोबल एनकॅपने दिलेल्या आहेत. नेक्सॉन या कॉम्पॅक्ट एसयुव्ही नंतर हॅचबॅक कार अल्टॉझने फाईव्ह स्टार रेटिंग मिळविल्या आहेत. यामुळे टाटाची पंच देखील या पंक्तीत जाऊन बसणार की नाही यावर साऱ्यांच्या नजरा आहेत. कंपनीनुसार या कारची सेफ्टी रेटिंग आणि किंमत लाँचिंगवेळीच जाहीर करणार आहेत. टाटा पंच देखील फाईव्ह स्टार रेटिंगची कार असल्याचे खुद्द टाटाच्याच बॅनरवर लीक झाले आहे. 

फिचर्सटाटा पंचमध्ये एबीएस सिस्टम, ISOFIX चाइल्ड सीट माउंट आणि कॉर्नर स्टेबिलिटी कंट्रोलची सुविधा असणार आहे. याशिवाय टाटा पंचमध्ये दोन एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत. इंजिनमध्ये Ram-Air Technology चा वापर केला आहे. यामुळे कार टॉप स्पीडवर खूप चांगलं मायलेज देऊ शकेल. टाटा पंचमध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. कार ०-६० किमीपर्यंतचा स्पीड अवघ्या ६.५ सेकंदात गाठते. तर १०० किमी प्रतितास इतका वेग अवघ्या १६.५ सेकंदात गाठेल. ७ इंचाची टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलं आहे. मायक्रो एसयूव्हीला १६ इंचाचे टायर्स आणि तब्बल १८७ एमएम ग्राउंड क्लिअरन्स असणार आहे. तर कारचे चारही दरवाचे ९० अंशापर्यंत उघडणारे असणार आहेत. जेणेकरुन कारमध्ये सहजपणे प्रवेश करता येईल.

टॅग्स :Tataटाटा