शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Tata Punch खरेदी करण्याचा विचार करताय? थांबा! कारमधून हटवण्यात आली महत्वाची गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 11:35 IST

टाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती.

टाटा पंच कार अल्पावधीच खूप लोकप्रिय झाली आहे. टाटा मोटर्सची ही एसयूव्ही गेल्या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये टॉप १० वाहनांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. या कारला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर तुम्ही देखील टाटा पंच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर जरा थांबा. कारण टाटा मोटर्सने या कारच्या बेस व्हेरिअंटमध्ये काही बदल केले आहेत. या अपडेटमुळे कारमधील सर्वात महत्त्वाचे फिचर काढून टाकण्यात आलं आहे.

ज्यांना टाटा पंच विकत घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. टाटा मोटर्सनं या कारमधून स्टार्ट/स्टॉप फंक्शन काढून टाकले आहे. आता तुम्ही विचार करत असाल की असं करण्यामागचं नेमकं कारण काय? महागाईमुळे वाहनांच्या किमतीतही वाढ होत आहे, अशा परिस्थितीत कार उत्पादक दोन मार्गांचा अवलंब करत आहेत. एकीकडे काही कंपन्या कारच्या किमती वाढवत आहेत, तर दुसरीकडे काही कंपन्या त्यांच्या कारमधून काही फीचर्स काढून टाकत आहेत. कारची किंमत न वाढवता त्यातून काही फिचर्स काढून टाकले की कारच्या निर्मितीचा खर्च कमी येतो आणि ग्राहकांनाही अतिरिक्त किमतीचा फटका बसत नाही. 

टाटा पंचला मिळालेत ५ स्टार टाटा पंच कारला GNCAP (ग्लोबल NCAP) क्रॅश टेस्टमध्ये फाइव्ह स्टार रेटिंग मिळाले आहे. ही एक परवडणारी एसयूव्ही बनली आहे की ज्या कारनं ५ स्टार रेटिंग प्राप्त केले आहे. त्यामुळे ग्राहकांनाही ही कार पसंतीस पडत आहे.

Tata Punch Priceटाटा कारच्या बेस प्युअर व्हेरिएंटची किंमत ५.९३ लाख रुपये आहे. तर त्याच्या टॉप मॉडेलची किंमत ९ लाख ४९ हजार रुपये इतकी आहे. ही एक्स शोरुम किंमत आहे. 

Tata Punch Featuresऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, मल्टीफंक्शन स्टिअरिंग कंट्रोल आणि कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी यांसारखी वैशिष्ट्ये या कारमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्लेसाठी ७-इंचाच्या इन्फोटेनमेंट सिस्टमसह सपोर्ट उपलब्ध आहे. सुरक्षेसाठी ड्युअल एअरबॅग्ज देण्यात आल्या असून कारच्या मागील बाजूस कॅमेरा आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन