शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

टाटाच्या या धाकड इलेक्ट्रिक SUV ला मिळणार डार्क एडिशन, देते 437km ची रेंज! जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2023 20:32 IST

Tata Nexon EV Max Dark Edition ला केबिन सोबतच ओव्हरऑल ब्लॅक एक्सटीरिअर थीम मिळण्याची शक्यता आहे.

 टाटा मोटर्सने (Tata Motors) देशात Nexon EV Max इलेक्ट्रिक SUV चे नवे व्हेरिअंट लॉन्च करण्यासाठी कंबर कसली आहे. टाटा मोटर्सने सोशल मिडिया हँडलवर एक टिझर शेअर केला आहे. यात Nexon EV Max ला लवकरच Nexon EV आणि Nexon EV प्राइम एडिशन सारखे डार्क एडिशन मिळेल, असा मेसेज दिला आहे. या टिझरमध्ये नव्या व्हेरिअंटची झलक दाखवत, हे 'द डार्क साइड ऑफ हाय-डेफिनेशन' आहे.

Tata Nexon EV Max Dark Edition ला केबिन सोबतच ओव्हरऑल ब्लॅक एक्सटीरिअर थीम मिळण्याची शक्यता आहे. नव्या व्हेरिअंटमध्ये समाविष्ट केल्या जाणाऱ्या इतर कॉस्मॅटिक अपडेटमध्ये चारकोल ग्रे अॅलॉय व्हील, पियानो-ब्लॅक डॅशबोर्ड आणि केबिनमध्ये ब्लॅक अपहोल्स्ट्रीचा समावेश आहे. याशिवाय, नेक्सॉन ईवी मॅक्सला अनेक नवे फीचर्स मिळण्याचीही शक्यत आहे. यात एका नव्या 10.25 इंचाच्या इंफोटेनमेंट स्क्रीनचाही समावेश असू शकतो.

Nexon EV Max ची किंमत -टाटा मोटर्सने गेल्या मे महिन्यात, भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Nexon EV च्या लॉन्ग-रेंज व्हेरिअंटच्या रुपात पहिल्यांदाच Nexon EV Max सादर केली होती. ही कार 17.74 लाख रुपये या सुरुवातीच्या किंमतीवर लॉन्च केली होती. नेक्सॉन ईव्ही मॅक्स एकदा चार्ज केल्यानंतर 437km किलोमीटरची ARAI-प्रमाणित रेंज देते असा दावा आहे. Nexon EV Max भारतात MG ZS EV आणि Hyundai Kona EV सारख्या रायव्हलला टक्कर देण्यासाठी लॉन्च करण्यात आली होती.

40.5 kWh बॅटरी पॅक -टाटा मोटर्सने Nexon EV Max ला स्टँडर्ड व्हेरिअँटच्या तुलनेत मोठी बॅटरी दिली होती. 40.5 kWh बॅटरी पॅक Nexon EV मध्ये वापरल्या जाणाऱ्या बॅटरी पॅकच्या तुलनेत 30% अधिक पॉवर फूल आहे. Nexon EV Max देखील Nexon EV पेक्षा अधिक पॉवर जनरेट करते. ही कार 143hp एवढी पॉवर आणि 250Nm चा पीक टार्क जनरेट करण्यास सक्षम आहे.

 

 

टॅग्स :TataटाटाcarकारAutomobileवाहन