शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Tata Motors Sale : टाटा मोटर्सच्या गाड्यांची तुफान विक्री; जानेवारी महिन्यात केला रकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 21:24 IST

डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला.

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) गाड्यांची जानेवारी महिन्यात मोठी विक्री झाली आहे. डिसेंबरमध्ये ह्युंदाई मोटरला (Hyundai Motors) मागे टाकून देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनल्यानंतर जानेवारीमध्ये विक्रीचा नवा विक्रमही कंपनीनं प्रस्थापित केला. कंपनीच्या देशांतर्गत वाहन विक्रीत गेल्या महिन्यात २६ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती टाटा मोटर्सनं दिली. Tata Motors ने जानेवारी 2022 मध्ये एकूण 72,485 युनिट्सची (प्रवासी आणि व्यावसायिक) विकल्या आहेत. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये कंपनीने केवळ 57,649 युनिट्सची विक्री केली होती.

मात्र, प्रवासी वाहनांबाबत सांगायचे झाल्यास त्यात कंपनीनं आणखी मोठी झेप घेतली आहे. टाटा मोटर्सने या वर्षी जानेवारी महिन्यात प्रवासी वाहनांच्या विक्रीत 50 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. कंपनीने प्रवासी वाहनांच्या 40,777 युनिट्सची विक्री केली आहे, जी या विभागातील टाटा मोटर्सची आतापर्यंतची सर्वाधिक विक्री आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात कंपनीने 26,978 तर डिसेंबरमध्ये 35,299 कार्सची विक्री केली होती.

Punch आणि Nexon चा वाटा मोठाकंपनीच्या या विक्रीत सर्वात मोठा वाटा टाटा पंच आणि टाटा नेक्सॉनचा आहे. या दोन्ही वाहनांच्या विक्रीने मिळून 10,000 युनिट्सचा आकडा पार केला आहे. सीएनजी गाडीलाही मोठा प्रतिसाद मिळाला आहे. जानेवारी 2022 मध्ये 3,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री झाली. लाँचच्या पहिल्या महिन्यात Tiago आणि Tigor च्या एकूण विक्रीत CNG व्हेरिअंटचा वाटा 42 टक्के होता. त्याच वेळी, पुण्यातील प्लांटने मार्च 2007 नंतर सर्वाधिक मासिक उत्पादन नोंदवले आहे.

टाटा मोटर्सची इलेक्ट्रीक वाहन विक्री जानेवारीमध्ये पाच पटीने वाढून 2,892 युनिट्सवर पोहोचली. कंपनीने जानेवारी 2021 मध्ये 514 इलेक्ट्रीक वाहनांची विक्री केली. यामध्ये Tata Nexon EV आणि Tigor EV यांचा समावेश आहे. अलीकडेच कंपनीने Tata Nexon EV च्या एकूण विक्रीने 13,500 युनिट्सचा टप्पा ओलांडला असून ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रीक कार असल्याचे कंपनीने सांगितले होते.

टॅग्स :TataटाटाIndiaभारतHyundaiह्युंदाई