शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

TATA च्या लोकप्रिय कारवर बंपर डिस्काउंट; ऑफर्स पाहिल्यानंतर खरेदी करण्याची होईल इच्छा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 16:32 IST

TATA Motors : कंपनीने Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari वर विविध सवलती दिल्या आहेत.

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांपासून टाटा मोटर्सच्या (TATA Motors) विक्रीत मोठी वाढ होताना दिसून येत आहे. विक्री आणखी वाढवण्यासाठी कंपनीने एप्रिल 2022 मध्ये जोरदार ऑफर दिल्या आहेत. कंपनीने Tata Tiago, Tata Tigor, Tata Harrier आणि Tata Safari वर विविध सवलती दिल्या आहेत. यामध्ये रोख सवलत/ग्राहक ऑफर, कॉर्पोरेट सूट आणि एक्सचेंज बोनस यांचा समावेश आहे. कंपनीने या कारवर ग्राहकांना एकूण 45,000 रुपयांपर्यंतचे फायदे दिले आहेत. 

टाटा टिआगो (Tata Tiago)एप्रिलमध्ये टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय हॅचबॅक टिआगोवर 23,000 रुपयांपर्यंतचा लाभ देत आहे. भारतात या कारची एक्स-शोरूम किंमत 5.22 लाख रुपये आहे. कंपनीने कारच्या XE, XM आणि XT व्हेरिएंटवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे, तर कॉर्पोरेट सवलतीसाठी 3,000 रुपयांचा फायदा होईल. एक्सचेंज आणि यापेक्षा महाग व्हेरिएंट्सवर कंपनी 10,000 रुपयांची ग्राहक सूट देत आहे. तसेच 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि  3,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देत आहे.

टाटा टिगोर (Tata Tigor)ही कंपनीची एक अतिशय लोकप्रिय सेडान आहे, ज्यावर एकूण 23,000 रुपयांपर्यंत सूट देण्यात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे. टिगोरचे XE आणि XM व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट सवलत मिळत आहे. कारच्या एक्सचेंज आणि याहून अधिक महाग व्हेरिएंटवर 10,000 रुपयांपर्यंत ग्राहक सूट देण्यात येत आहे. तसेच, 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 3,0000 रुपयांची कॉर्पोरेट सूट दिली जात आहे.

टाटा हॅरियर (Tata Harrier)टाटा मोटर्सच्या शक्तिशाली एसयूव्ही हॅरियरला 45,000 रुपयांपर्यंतच्या ऑफर मिळाल्या आहेत, ज्याची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 14.53  लाख रुपये आहे. हॅरियरच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 5,000 रुपयांची कॉर्पोरेट सूट देण्यात आली आहे.

टाटा सफारी (Tata Safari)काही काळापूर्वी सफारी नेमप्लेट भारतात परत आली आहे आणि आता कंपनी या एसयूव्हीवर एकूण 40,000 रुपयांपर्यंतचा फायदा देत आहे. या एसयूव्हीची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 15.02 लाख रुपये आहे. कंपनीने सफारीच्या XE आणि XM व्हेरिएंटवर 40,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन