शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 15:59 IST

Tata Motors : खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Tata Motors Hikes Prices Update:कार खरेदी करण्याचा विचार करताय? तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने (TATA motors) प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. 17 जुलै 2023 पासून विविध मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किमती 0.6 टक्क्यांनी वाढणार आहेत. खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

2023 मध्ये टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी कंपनीने 1 फेब्रुवारी आणि 1 मे पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 17 जुलैपासून ही भाडेवाढ ICE(रेग्युलर पेट्रोल-डिझेल गाडी) आणि इलेक्ट्रिक वाहनांना लागू होणार आहे.

लवकर करा बुकिंग17 जुलैपूर्वी टाटाची गाडी खरेदी करणाऱ्यांना सध्याच्या किमतीत गाडी दिली जाणार आहे. कंपनी 16 जुलै 2023 पर्यंत कार आणि SUV चे बुकिंग करणार्‍या ग्राहकांना आणि 31 जुलै 2023 पर्यंत वाहनांची डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या किमतीत गाडी देणार आहे. 

दर का वाढवले?गाडी तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाढल्यामुळे किमती वाढवल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी कंपनी स्वतःच जास्तीचा भार उचलत होती, मात्र आता हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर Tiago, Tigor आणि Altrozसह सर्व प्रवासी वाहनां​च्या किमती वाढतील. किमतीतील वाढ मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार केली जाईल.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनcarकारbusinessव्यवसाय