शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Tata Motors Hikes Prices : टाटा मोटर्सनेही वाहनांच्या किमती वाढवल्या; 1 एप्रिलपासून लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 15:52 IST

Tata Motors Hikes Prices : कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे. 

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बऱ्याच दिवसांनंतर आज पुन्हा एकदा वाढ होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैसे प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, आता इंधन महाग होत असताना वाहनेही महागणार आहेत. दरम्यान, 1 एप्रिल 2022 पासून टाटा मोटर्स आपल्या व्यावसायिक वाहनांच्या (Commercial Vehicles) किमती वाढवणार आहे. कंपनी व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीनुसार 2 ते 2.50 टक्क्यांनी किमती वाढवणार आहे, असे टाटा मोटर्सने (Tata Motors) म्हटले आहे. 

टाटा मोटर्सने स्टॉक एक्स्चेंजला किमतीत वाढ झाल्याची माहिती देताना म्हटले की, अलीकडच्या काळात स्टील, अॅल्युमिनियम, इतर धातू आणि इतर कमोडिटी मटेरियलच्या किमती वाढल्यामुळे कंपनी व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवणार आहे. तसेच, कंपनी स्वतःच खर्च वाढीचा मोठा हिस्सा सहन करत आहे, असे कंपनीने आपल्या निवेदनात म्हटले आहे. परंतु इनपुट कॉस्टमध्ये कमालीची वाढ झाल्याने किमान त्याची किंमत वाढवणे आवश्यक झाले आहे. 

टाटा मोटर्स ही देशातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी आहे. मात्र, टाटा मोटर्सने अद्याप प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ केलेली नाही. 2022 मध्ये कंपनीने दुसऱ्यांदा किमती वाढवल्या आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, 1 जानेवारी 2022 पासून, टाटा मोटर्सची व्यावसायिक वाहने महाग झाली होती.

मर्सिडीज बेंझ इंडियानेही वाढवली किंमत लक्झरी कार निर्माता कंपनी मर्सिडीज-बेंझ इंडियाने सर्व मॉडेल्सच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने सांगितले की, त्यांचे सर्व मॉडेल्स आता तीन टक्क्यांपर्यंत महाग असतील. लॉजिस्टिक्सच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याने जास्त किंमतीमुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र, या दरवाढीचा ग्राहकांना फारसा त्रास होऊ नये, यासाठी कंपनीने प्रयत्न केले आहेत.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहनbusinessव्यवसाय