शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

'टाटा हॅरियर' देणार भल्याभल्यांना टक्कर; तुम्ही पाहिलीत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 01:02 IST

टाटा मोटर्सनं H5X या एसयूव्ही प्रकारात नव्या स्पोर्ट् कारच्या नावाचा खुलासा केला आहे.

नवी दिल्ली- टाटा मोटर्सनं H5X या एसयूव्ही प्रकारात नव्या स्पोर्ट् कारच्या नावाचा खुलासा केला आहे. या कारचं नामकरण 'Tata Harrier' करण्यात आलं आहे. कंपनीनं ही कार जॅग्वार लँड रोव्हरच्या मदतीनं तयार केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच टाटानं H5X एसयूव्ही प्रकारातील ही स्पोर्ट्स कार 2018च्या ऑटो एक्स्पोमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली होती.'Tata Harrier' ही कार 2019पासून रस्त्यावर धावणार आहे. टाटा मोटर्सची फ्लॅगशिप असलेली एसयूव्ही प्रकारातील ही पहिली कार ठरणार असून, टाटा नेक्सॉनच्या पुढची आवृत्ती असेल. टेक्नॉलॉजी, स्टाइल आणि परफॉर्मन्समध्ये Tata Harrier जबरदस्त असून, या कारच्या माध्यमातून टाटा मोटर्सच्या फ्युचर जेनरेशन मॉडल्सची झलकही पाहायला मिळणार आहे. Tata Harrier कारमध्ये 'इम्पॅक्ट डिझाइन 2.0'च्या थीमचा वापर करण्यात आला आहे. Tata Harrier ही एसयूव्ही प्रकारातील कार ओमेगा मोनोकॉकच्या तुलनेत जबरदस्त ठरणार आहे.या कारला Jaguar Land Rover (JLR)सोबत मिळून बनवण्यात आली आहे. त्यामुळे Tata Harrier ही कार कंपनीसाठी फायदेशीर ठरू शकते. भारतात ही कार Hyundai Creta, Renault Captur, Jeep Compassला टक्कर देणार आहे. Tata Harrier ही कार पेट्रोल आणि डिझेल दोन्ही प्रकारांत उपलब्ध असणार आहे. या कारमध्ये 2.0 लीटरचं डिझेल इंजिन जीप कंपसच्या स्वरूपात देण्यात येऊ शकतं. खरं तर गरिबांची कार म्हणून ओळख असलेल्या टाटा मोटर्ससाठी ही कार गेमचेंजर ठरू शकते. 

टॅग्स :Tataटाटा