जीएसटी कपातीमुळे २२ सप्टेंबरपासून सर्वच वस्तूंच्या किंमती कमी होणार आहेत. याप्रमाणे वाहनांचे दरही कमी होणार आहेत. ते किती होतील त्याची वजाबाकी कंपन्या करत असताना टाटाने आपल्या ताफ्यातील कारच्या किंमती कितीने कमी होणार हे जाहीर करून टाकले आहे.
टाटा मोटर्सने त्यांच्या सर्वात स्वस्त कार टाटा टियागोपासून प्रसिद्ध एसयूव्ही टाटा सफारीपर्यंत सर्व वाहनांच्या किमतीत बदल केले आहेत. ही कपात २२ सप्टेंबरपासून सर्व डीलरशीपवर लागू होणार आहे. आता या किंमती राज्या राज्यांप्रमाणे वेगवेगळ्या असणार आहेत.
टाटाच्या वाहनांवर किती जीएसटी कमी झाला...टियागो 75,000टिगोर 80,000Altroz 1,10,000पंच 85,000Nexon 1,55,000कर्व्ह 65,000हॅरियर 1,40,000सफारी 1,45,000
टाटाची सर्वात स्वस्त टियागो आता जवळपास ७५००० रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. तर सर्वाधिक कर कपात ही टाटा नेक्सॉनवर झाली आहे. एवढेच नाहीतर टाटा अल्ट्रॉझ 1,10,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. टाटाच्या एसयुव्ही हॅरिअर, सफारीवरील जीएसटी हा १.४० लाखांहून अधिक कमी झाला आहे.