शहरं
Join us  
Trending Stories
1
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
2
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
3
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
4
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
5
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
6
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
7
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
8
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
9
सात वर्षांनीही सापडला नाही मृतदेह; किर्ती व्यास हत्या प्रकरणात सहकारीच निघाले आरोपी
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
12
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
13
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
14
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
15
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
16
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
17
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
18
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
19
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 
20
या देशात सोडण्यात आले लॅबमध्ये विकसित केलेले लाखो डास, समोर आलं असं कारणं

'ब्लॅकबर्ड' नावाची जबरदस्त एसयूव्ही टाटा आणणार, ह्युंदाईच्या क्रेटाला देणार टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2022 3:32 PM

Tata Blackbird : Hyundai Creta आणि Kia Seltos ची बाजारपेठ काबीज करण्यासाठी टाटा लवकरच बाजारात आपली सर्वोत्तम एसयूव्ही लाँच करणार आहे.

नवी दिल्ली : देशात मिड साइज एसयूव्ही ( SUV) सेगमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कार विकल्या जातात. या सेगमेंटमध्ये ह्युंदाई क्रेटाचे (Hyundai Creta) वर्चस्व दीर्घकाळापासून अबाधित आहे. या सेगमेंटमध्ये दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार किया सेल्टोस (Kia Seltos) आहे. पण आता लवकरच टाटा मोटर्सही (Tata Motors) या सेगमेंटमध्ये पाऊल टाकणार आहे. Hyundai Creta आणि Kia Seltos ची बाजारपेठ काबीज करण्यासाठी टाटा लवकरच बाजारात आपली सर्वोत्तम एसयूव्ही लाँच करणार आहे. या एसयूव्हीचे नाव ब्लॅकबर्ड (Blackbird SUV) असण्याची शक्यता आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आगामी नवीन एसयूव्ही सध्याच्या नेक्सॉनवर (Nexon) आधारित असणार आहे. पण याची लांबी नेक्सॉन पेक्षा जवळपास 4.3 मीटर जास्त असेल. कंपनी या नवीन वाहनाला ब्लॅकबर्ड असे नाव देऊ शकते. मात्र हे नाव फायनल नसून कंपनी यात बदलही करू शकते. सर्वाधिक विकली जाणारी कंपनीची कार नेक्सॉनच्या X1 प्लॅटफॉर्मवर आगामी ब्लॅकबर्ड एसयूव्ही तयार केली जाऊ शकते. पण, याचा आकार मोठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे यात अधिक जागा आणि अधिक बूट स्पेस पाहायला मिळेल. तसेच, एसयूव्हीची डिझाइन नवीन असू शकते आणि याचा पुढचा आणि मागचा लूक वेगवेगळ्या डिझाइनमध्ये मिळण्याची शक्यता आहे.

कसे असेल इंजिन? या कारमध्ये नवीन 1.5-लिटर पेट्रोल इंजिन वापरले जाऊ शकते. जे नेक्सॉनमध्ये असलेल्या 1.2-लीटर रेवोट्रॉन इंजिनपेक्षा मोठे आणि अधिक पॉवरफुल असणार आहे. हे इंजिन 160 hp पॉवर जनरेट करेल. तसेच यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन मिळू शकतो. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत सुमारे 11 लाख रुपये असण्याची शक्यता आहे.

क्रेटाशी होणार स्पर्धाआगामी ब्लॅकबर्ड भारतीय बाजारपेठेत ह्युंदाई क्रेटाशी स्पर्धा करेल. ही कार तीन इंजिन ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये 1.5-लिटर MPI पेट्रोल इंजिन, 1.5-लीटर U2 CRDi डिझेल इंजिन आणि 1.4-लिटर कप्पा टर्बो GDI पेट्रोल समाविष्ट आहे. जे अनुक्रमे 113bhp आणि 143.8Nm, 113bhp आणि 250Nm आणि 138bhp चे आउटपुट जनरेट करतात. ही कार मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन दोन्ही ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

टॅग्स :TataटाटाAutomobileवाहन