शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

कार घेताय? मग जरा थांबा...या वर्षी येताहेत ८१ नवी माॅडेल्स; ई-वाहनांचीही पर्वणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2023 12:29 IST

आधुनिक तंत्रज्ञानासह मिळणार अनेक सुविधा

नवी दिल्ली : देशात गेल्या वर्षी वाहन विक्रीचा सुसाट वेग हाेता. आता नव्या आर्थिक वर्षासाठी कार कंपन्यांनी आक्रमक तयारी केली आहे. वर्षभरात तब्बल ८१ नवे माॅडेल्स लाॅंच करण्यात येणार आहेत. त्यात ४७ टक्के वाटा लक्झरी कारचा राहणार असून ई-वाहनांचाही समावेश आहे.

वाहन विक्रेत्यांची संघटना ‘फाडा’च्या आकडेवारीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात एकूण ३६.२० लाख कार विक्री झाली हाेती. हा आकडा २०२१-२२ च्या तुलनेत २३ टक्क्यांनी जास्त आहे. जेटाे डायनामिक्स या ऑटाे इंटेलिजन्स फर्मच्या अहवालानुसार, नव्या माॅडेल्सपैकी ६६ टक्के कार्स नव्या प्लॅटफाॅर्मवर बनविण्यात येणार आहेत.  बदलते नियम, नवे तंत्रज्ञान, इंधनाचे बदलते स्वरूप इत्यादींचा परिणाम नव्या वाहनांमध्ये दिसणार आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नव्या माॅडेल्ससाठी आक्रमक पवित्रा कशामुळे?ग्राहकांच्या आवडी बदलत आहेत. त्यामुळे नव्या रचनेवर भर देण्यात येत आहे. काॅम्पॅक्ट एसयूव्ही आणि एसयूव्हीला गेल्या वर्षी प्रचंड मागणी दिसून आली. त्यामुळे कंपन्या याकडे लक्ष केंद्रित करत आहेत. येणाऱ्या काळात ई-वाहनांकडे कल राहणार आहे. ग्राहकही ई-वाहनांची खरेदी करू लागले आहेत. त्यासाेबतच हायब्रीड तंत्रज्ञानालाही मागणी आहे. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानावर कंपन्या भर देत आहेत. किमती जास्त असल्या तरीही हायब्रीड गाड्या विकल्या जातात. देशभरात वाहन प्रदूषणाशी संबंधित बीएस६-II नियम लागू झाले आहेत. त्यामुळे इंजिनमध्ये बदल करावे लागणार आहेत.

रेंज आणि स्मार्टनेस वाढणारनव्या ई-कार्समध्ये बदललेले तंत्रज्ञान तसेच जास्त रेंज मिळेल. सध्या २५० किलाेमीटरपासून रेंज सुरू हाेते. नव्या गाड्यांमध्ये रेंज किमान ३५० किमी एवढी राहील. पेट्राेल गाड्यांचाही स्मार्टनेस वाढणार आहे. मायलेज वाढविण्यासाठी कंपन्या कारचे वजन कमी करण्याचाही विचार करीत आहेत.

टॅग्स :carकार