टाटाने मालवाहतूक करणाऱ्या गाड्याच बनवाव्यात, असे अनेकदा म्हटले जाते. मात्र, टाटा मोटर्सने गेल्या काही वर्षांत कात टाकली असून चांगल्या कार ग्राहकांच्या सेवेत आणल्या आहेत. मात्र, टाटाच्या इंडिकाने कमालच केली आहे. दहा वर्षे जुनी या कारने तब्बल 5.85 लाख किमींचे अंतर एकदाही इंजिनाचे काम न करता कापले आहे. केरळमधील ही कार असून टाटाच्या सर्व्हिस सेंटरकडून मालकाचा सत्कारही करण्यात आला आहे.
महत्वाचे म्हणजे टाटा इंडिका ही कार भारतातील पहिली पॅसेंजर कार होती. यामुळे लाँच झाल्यापासून ही कार ग्राहकांच्या पसंतीस उतरली होती. मोठी केबिन आणि डिझेल इंजिनमुळे ही परवडणारी कार रस्त्यावर धावू लागली होती. आता या कारने आणखी एक विक्रम केला आहे. केरळच्या हायसन चलाक्कुडी टाटा या डिलरने मालकाचा सत्कार केला आहे.
या कारबाबत अधिक माहिती मिळालेली नसली तरीही महिन्याला एवढे किमी चालविली गेली आहे, म्हणजे ती एकतर प्रवासी वाहतुकीसाठी असावी किंवा व्यवसायासाठी. अन्यथा एका महिन्यात 60 हजार किमी चार चालविणे तसे परवडणारे आणि शक्यही नाही. अशा काही कार आहेत ज्यांनी 8 ते दहा लाखांपर्यंत रनिंग केलेली आहे.