शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Maserati नं लॉन्च केली सुपरकार MC20, केवळ 2.9 सेकेंदात घेते तुफान स्पीड! फीचर जाणून प्रेमात पडाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 18:55 IST

Maserati कंपनी ही तिच्या जबरदस्त स्पोर्ट्स कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येथील बाजारातील फरारी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनी सारख्या ब्रँड्सना टक्कर देते. 

लक्झरी कार चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इटलीतील आघाडीची स्पोर्ट्स कार उत्पादक कंपनी असलेल्या Maserati ने भारतीय बाजारात आपली पावरफुल सुपरकार Maserati MC20 लॉन्च केली आहे. आकर्षक लुक आणि पॉवरफुल इंजिन असलेल्या या सुपरकारची सुरुवातीची किंमत 3.69 कोटी रुपये (एक्स-शोरूम, भारत) एवढी निश्चित करण्यात आली आहे. Maserati कंपनी ही तिच्या जबरदस्त स्पोर्ट्स कारसाठी जगभरात प्रसिद्ध आहे आणि येथील बाजारातील फरारी, पोर्श आणि लॅम्बोर्गिनी सारख्या ब्रँड्सना टक्कर देते. 

खरे तर बऱ्याच दिवसांपासून Maserati MC20 ची प्रतीक्षा केली जात होती. यापूर्वी ही कार 2022 मध्ये लॉन्च होण्याचा अंदाज होता. मात्र उशिराका होईना ही कार भारतीय रस्त्यांवर धावण्यासाठी आली आहे. डिलरशिप सोर्सेसच्या हवाल्याने, मिडिया रिपोर्ट्सनुसार या कारच्या पहिल्या युनिटची डिलिव्हरी मे महिन्यात होऊ शकते. जाणून घेऊयात कारची खासियत.. 

Maserati MC20 ची पॉवर आणि परफॉर्मन्स -कंपनीने या कारमध्ये 3.0 लिटर क्षमतेचे पॉवरफूल ट्विन-टर्बोचार्ज V6 इंजिन वापरले आहे. हे इंजिन 630hp पॉवर आणि 730Nm चा टॉर्क जनरेट करते. महत्वाचे म्हणजे, हे इंजिन 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले गेले आहे. कंपनीचा दावा आहे की ही कार केवळ 2.9 सेकंदात 0 ते 100 किमी प्रतितास एवढा स्पीड घेऊ शकते आणि तिची टॉप स्पीड 325 किमी प्रतितास एवढी आहे.

Maserati MC20 वर एक नजर - इंजिन : 3.0 लिटर V6पिक-अप : 2.9 सेकेंदात 0 ते 100Kmphटॉप स्पीड : 325 किलोमीटर प्रति तासकिंमत : 3.69 कोटी रुपये  या कारमध्ये 10 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट डिस्प्ले आणि 10 इंचांचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम देण्यात आले आहे. तसेच कार्बन फायबरने झाकलेल्या सेंट्रल कंसोलमध्ये केवळ ड्राइव्ह मोड सिलेक्टर, एक वायरलेस स्मार्टफोन होल्डर, इंफोटेनमेंट कंट्रोल आणि काही इतर छोटे फंक्शन्स देण्यात आले आहे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार