शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

तप्त सूर्यकिरणांपासून कारचा बचाव करणारे सनशेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 13:21 IST

कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात

ठळक मुद्देपुढील व मागील बाजूने सूर्यप्रकाश रोखणे, त्याचे किरण परावर्तीत करणारे चांदीसारखे चकचकीत कव्हर असणारे सनशेड वायझर उपयोगाला येतेसूर्यप्रकाश त्यावर पडताच तो परावर्तीतही होतो व सनशेड काचेवर ठेवल्याने आतील भाग सावलीतही जातो

कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात. मग कार सुरू करण्यापूर्वी दारे उघडी ठेवून काही वेळ कूलींग करण्याचा प्रयत्न होतो. ओल्या फडक्याने पुसून घेऊन ही उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांकडेच काही शेडमधील पार्किंग उपलब्ध असते असे नाही. त्यामुळे ही सारी उन्हाची तलखी सहन करावी लागते. यामुळे ए.सी. लावला तरी सुरुवातीला कूलींगचा थंडपणाही मिळत नाही. एकूण सूर्यप्रकाशाचा कडकपणा त्रासदायक होतो. सावलीत उभी करण्यासाठी कारला जागाही नसते.

अशा परिस्थितीत पुढील व मागील बाजूने सूर्यप्रकाश रोखणे, त्याचे किरण परावर्तीत करणारे चांदीसारखे चकचकीत कव्हर असणारे सनशेड वायझर उपयोगाला येते. कारच्या बाहेरच्या बाजूने हे लावायचे असते. त्यामुळे सूर्यप्रकाश त्यावर पडताच तो परावर्तीतही होतो व सनशेड काचेवर ठेवल्याने आतील भाग सावलीतही जातो. बाहेरच्या बाजूला ते ठेवल्याने काचही गरम होत नाही. मात्र बाहेर ठेवण्यासारखी परिस्थिती सर्व ठिकाणी असेल असेही नाही. ते चोरीला जाण्याची, खराब होण्याचीही शक्यता असते. यासाठी काही जण त्याचा वापर करण्यासाठी कारच्या डॅशबोर्डवर आतील बाजूने सनशेड वायझर लावतात. त्यामुळेहू परिणाम चांगला होतो, पण काचेवर सूर्यकिरणांची प्रखरता येत असल्याने काच तापतेच. अर्थात हे सारे करण्यामागचा हेतू काही अंशाने नव्हे तर बऱ्यापैकी सफल होतो.

सनशेड हे साधन अतिरिक्त असून ते काही कार विकत घेताना दिले जात नाही. तुम्हाला ते बाजारातून घ्यावे लागते. आजकाल ऑनलाइन विक्रीद्वारेही बरीच साधनसामग्री मिळत असते. पण प्रत्यक्ष एखादी वस्तू पाहाणे, ती अनुभवणे, तिची किंमत तपासणे, चार दुकानांमध्ये जाऊन त्याचे प्रकारही प्रत्यक्ष पाहाणे हे काही ऑनलाइनवर शक्य होत नाही. सनशेडचे वेगळे आकार, कंपन्या या बाजारात प्रत्यक्ष पाहू शकता. त्याचा वापर करणे भारतातील अनेक उष्ण भागात उपयुक्त ठरतो. पार्किंग सावलीत करण्याची सुविधा सर्वांकडे नसली तरी कारमधील वातावरण गरम न होऊ देण्यासाठी हे एक तसे सुटसुटीत साधन आहे. उन्हात पत्रा तापतो पण त्याला सनशेडचा हा उपाय कामाचा नाही. कारण याचा आकारही तुमच्या कारच्या काचेइतका असतो. पण त्यामुळे कारमध्ये सूर्यप्रकाश थेट येऊन कारचा आतील भाग गरम होण्यापासून बऱ्याच अंशी वाचतो, हे मात्र खरे.

टॅग्स :Automobileवाहनcarकार