शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sunroof धावत्या कारमधून बाहेर निघण्यासाठी नसते, बहुतांश लोकांना याचा वापरच माहीत नाही! जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 18:39 IST

advantages and disadvantages of sunroof : लोक अनेक वेळा सनरूफमधून बाहेर येत मस्ती करताना दिसतात. हे योग्य नाही. हे धोकादायक आहे.

आजकाल सनरूफ हे कारच्या विक्रीत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसत आहे. ग्राहकही कार निवडताना आता सनरूफचा विचार करतात. मात्र, सनरूफ असलेली कार खरेदी केल्यानंतर, अनेकजण सनरूफचा गैरवापर करताना दिसतात. खरे तर, सनरूफचा खरा उपयोग काय? हेच त्यांना माहीत नसते. 

धावत्या कारमध्ये सनरूफच्या बाहेर निघत मस्ती करताना आपण अनेकांना पाहिले असेल. एवढेच नाही, तर अनेक वेळा मुलेही सनरूफच्या बाहेर निघत चालत्याकारमध्ये मस्ती करताना आपण पाहिले असतील. पण, कारमध्ये या गोष्टींसाठी सनरूफ दिले जाते का?

कारमध्ये कशासाठी असते सनरूफ? -- सनरूफचा सर्वात पहिला फायदा म्हणजे, यामुळे कारमध्ये नैसर्गिक प्रकाश येऊ शकतो. आपल्याला केवळ विंडो ग्लासमधून तेवढा प्रकाश मिळत नाही. 

- सनरूफच्या माध्यमाने कार लवकरात लवकर थंड केली जाऊ शकते. जर आपली कार उन्हात उभी असेल, तर थोड्या वेळासाठी सनरूफ ओपन करून ती लवकर थंड केली जाऊ शकते. 

- कारमध्ये सनरूफ असल्यास आपल्याला मोकळे वाटते. यामुळे आपल्याला कारचे केबीन प्रेशियस वाटते.

कधीच करू नका अशी चूक - लोक अनेक वेळा सनरूफमधून बाहेर येत मस्ती करताना दिसतात. हे योग्य नाही. हे धोकादायक आहे. मुलांनी कितीही त्रास दिला तरी त्यांना सनरूफ बाहेर नुघू देऊ नका. कारण एखाद वेळा इमरजन्सी ब्रेक लावण्याची वेळ आली, तर सनरूफच्या बाहेर निघालेल्या मुलाला अथवा कुण्याही व्यक्तीला इजा होऊ शकते. हे जीवघेणेही ठरू शकते. एवढेच नाही, तर हार्ड ब्रेकिंगदरम्यान सनरूफबाहेर निघालेली व्यक्ती कार बाहेरही फेकली जाऊ शकते.

टॅग्स :Automobileवाहनcarकार