शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

शानदार ऑफर! 'या' 4 आलिशान SUV वर 1.30 लाख रुपयांपर्यंत मिळतोय डिस्काउंट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 17:21 IST

Discount on 4 luxurious SUVs : जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. बाजारात चार SUV कारवर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

नवी दिल्ली : लवकरच 2021 हे यंदाचे वर्ष संपणार आहे. यातच कार खरेदीवर प्रचंड सूट मिळणार आहे. टाटा (Tata) ते महिंद्रा (Mahindra) आणि ह्युंदाईपासून  (Hyundai) मारुती सुझुकीपर्यंत (Maruti Suzuki) सर्वच कंपन्या कार खरेदीवर भरघोस सूट देत आहेत. इन्व्हेंटरी रिकामे करण्यासाठी असे केले जात आहे. जानेवारीत वाहनांच्या किमती वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, जर तुम्ही नवीन SUV कार घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. बाजारात चार SUV कारवर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत सूट मिळत आहे.

रेनो डस्टर (Renault Duster)रेनो डस्टर एसयूव्हीवर (Renault Duster SUV) वर 1 लाख 30 हजार रुपयांपर्यंत कमाल सूट मिळत आहे. रेनो डस्टर एसयूव्ही खरेदी केल्यास 50,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 50,000 रुपयांपर्यंत रोख सवलत आणि 30,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट लाभ मिळतील. रेनो डस्टर एसयूव्हीमध्ये 1.5 लीटर पेट्रोल इंजिन आणि 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे. यामध्ये पहिले इंजिन 106hp आणि दुसरे इंजिन 156hp चे आहे.

निसान किक्स (Nissan Kicks SUV)निसान किक्स (Nissan Kicks SUV) कार खरेदीवर तुम्हाला कमाल 1 लाख रुपयांची सवलत मिळेल. निसान किक्स एसयूव्ही खरेदी केल्यावर 70,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 15,000 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट आणि 10 हजार रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट बेनिफिट दिले जातील. ऑनलाइन बुकिंग केल्यावर तुम्हाला 5000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट मिळेल. निसान किक्स एसयूव्हीमध्ये 1.3 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5लीटर पेट्रोल इंजिन देखील आहे.

महिंद्रा XUV300 (Mahindra XUV300)दुसरीकडे, महिंद्राची XUV300 खरेदी केल्यास, तुम्हाला कमाल 69 हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. Mahindra XUV300 खरेदी केल्यावर, तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस, 30 हजार रुपयांपर्यंत रोख सूट आणि 4,000 रुपयांपर्यंतचे कॉर्पोरेट फायदे मिळतील.

महिंद्रा KUV100 (Mahindra KUV100)महिंद्राची आणखी एक कार आहे, जी तुम्ही खरेदी करून प्रचंड सूट मिळवू शकता. Mahindra KUV100 खरेदी केल्यावर तुम्हाला 38 हजार 55 रुपयांपर्यंत कॅश डिस्काउंट, 20 हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बेनिफिट मिळेल. महिंद्रा KUV100 मध्ये 1.2 लीटरचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे, ज्याची 83hp क्षमता आहे.

टॅग्स :carकारAutomobileवाहन