शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

मोटारसायकलीला लावण्याचे छोटोसे पण अत्यंत उपयुक्त हॅण्डल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2017 16:00 IST

लेडीज हॅण्डल ही मोटारसायकलीला लावण्याचे एक छोटेसे साधन आहे. महिला मागे बसताना त्याना हात घट्ट पकडून बसण्याची ही सुटसुटीत रचना आहे

ठळक मुद्देअर्थात अनेक सामग्री कंपनीफिटेड नसतात, त्यांची व्यवस्था तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार करावी लागतेलेडीज हॅण्डल या नावाने ओळखली जाणारी ही सामग्री तुम्हाला मोटारसायकलीला हुकासारखी नटद्वारे लावावी लागतेएक छोटीशी पण तशी उपयुक्त असणारी ही सामग्री आहे

मोटारसायकलीला सामान वाहून नेण्याची सुविधा फार नसते. मात्र त्यासाठी मोटारसायकलीच्या वेगवेगळ्या भागाला पिशव्या अडकवल्या जातात, बॅगा लटकावतात. वास्तविक कशाही पद्धतीने त्या लटकावल्याने ड्रायव्हिंग करतानाही त्रास होतो, मागे बसलेल्यांनाही त्रास होतो. महिलांना मागे बसताना हात धरायलाही जागा उरत नाही. मोटारसायकलीवर बसणाऱ्या महिलांना मागे बसल्यानंतर हात नीटपणे व घट्ट धरून बसता यावे, यासाठी एक चांगली एक्सेसरी बाजारात मिळते. मोटारसायकल विकत घेताना कंपनीकडून ती काही दिली जात नाही.

अर्थात अनेक सामग्री कंपनीफिटेड नसतात, त्यांची व्यवस्था तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार करावी लागते. बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या साधनांची फेरफटका मारून चौकशी केली तर अनेक वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला बाजारात दिसून येतील. लेडीज हॅण्डल या नावाने ओळखली जाणारी ही सामग्री तुम्हाला मोटारसायकलीला हुकासारखी नटद्वारे लावावी लागते. सस्पेंशनच्या नटलाच ती जोडता येते. त्याला लंबवर्तुळाकार आकाराची एक साधी रचना असते व ती मोटारसायकलीला अंगभूत आहे अशी वाटावी इतकी फीट बसते.

त्याचा उपयोग हा जसा मागे बसणाऱ्या महिलेला वा पुरुषालाही घट्ट धरून बसण्यासाठी होतो तसाच छोटी पर्स, पिशवी लटकवण्यासाठीही होतो. मोटारसायकल पार्किंगमध्ये उभी करताना स्टँडवर लावावी लागते, तेव्हाही या हॅण्डलचा आधार घेता येतो. मोटारसायकलस्वाराच्या डाव्या बाजूला व मागे बसणाऱ्या व्यक्तीच्या दरम्यान हे हॅण्डल प्रामुख्याने लावले जाते. दोन्ही बाजूलाही ते लावता येते. पण साधारणपणे ते एकाच बाजूला व खास करून डाव्या बाजूला ते लावले जाते. एक छोटीशी पण तशी उपयुक्त असणारी ही सामग्री आहे. 

टॅग्स :Automobileवाहन