शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

Simple Energy: ओलाला यातही पछाडणार सिंपल वन! इलेक्ट्रीक स्कूटर विश्वातील केली मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2021 20:10 IST

Simple One vs. Ola s1 Electric Scooter: ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे.

सिंपल एनर्जीने (Simple Energy) बुधवारी मोठी घोषणा केली आहे. तामिळनाडू सरकारसोबत मॅन्युफॅक्टरिंग प्लँट स्थापन करण्यासाठी 2500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत करार केला आहे. कंपनीच्या दाव्यानुसार हा इलेक्ट्रीक स्कूटरचा जगातील सर्वात मोठा प्लँट असणार आहे. 

काही महिन्यांपूर्वी ओलानेदेखील जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक दुचाकी बनविणारी फॅक्टरी टाकल्याचा दावा केला होता. या फॅक्टरीचे नाव फ्युचर फॅक्टरी असे ठेवण्यात आले आहे. ओलाचा देखील तामिळनाडूमध्ये प्लांट आहे. ओलाने या फॅक्टरीमध्ये दरवर्षी 1 कोटी युनिट्स उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. 

ओलाच्या स्कूटरपेक्षा जास्त रेंज असलेली स्कूटर सिंपल एनर्जीने लाँच केली होती. दोन्ही कंपन्यांनी एकाच दिवशी या स्कूटर लाँच केल्या होत्या. शिवाय ओलाच्या स्कूटरपेक्षा Simple One ची किंमतही खूप कमी आहे. सिंगल चार्जमध्ये मिळते सर्वाधिक 236kms ची रेंज. सिंपल एनर्जीने विक्रीच्या खेळातही ओलाला टक्कर देण्याची तयारी केली आहे. पहिल्या टप्प्यात होसुरच्या शूलगिरीमध्ये 2022 पासून कंपनी दर वर्षी 10 लाख युनिट्स तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्या टप्प्यात दुसऱ्या प्लांटमध्ये 1000 कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. धर्मपुरीच्या 600 एकर जमिनीवर ही कंपनी उभी राहणार आहे. यामध्ये संशोधन, विकास केंद्र, जागतिक स्तरावरील टेस्टिंग सेंटर आणि एक विक्रेता पार्क उभारला जाईल. 

सिंपल वनमध्ये काय आहे खास?या स्कूटरमध्ये 4.8 KWh क्षमतेच्या बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. तसंच या स्कूटरची मोटर 4.5 KW क्षमतेची पॉवर जनरेट करते. तसंच ही स्कूटर 2.95 सेकंदात 0 पासून 40 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते असा दावा कंपनीनं केला आहे. या स्कूटरचा सर्वाधिक वेग 105 किमी प्रति तास इतका आहे. 110 किमी वजन असलेल्या या स्कूटरमध्ये 30 लिटरची बुट स्पेस (अंडरसीट स्टोरेज) देण्यात आलं आहे. यामध्ये तुम्ही एक मोठं हेल्मेटही ठेवू शकता. सिंगल चार्जमध्ये ही स्कूटर 236 किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते असा दावा कंपनीनं केला आहे. या प्रकरणी ही स्कूटर ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मागे सोडते. ओलाच्या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 181 किमी इतकी आहे.

टॅग्स :Olaओला