शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

'सेकंड हॅन्ड' वाहने 'सुसाट'! ७० हजारांपासून दहा लाखांपर्यंतच्या गाड्या बाजारात

By दिपक दुपारगुडे | Updated: March 29, 2023 18:21 IST

दिवसाला २५ लाखांची उलाढाल, सेकंड हॅन्ड गाड्यांचा बिजनेस 'फर्स्ट क्लास'

दीपक दुपारगुडे, सोलापूर: सध्या वाढत्या महागाईमुळे नवीन गाडी घेणे सर्वसामान्यांना आवाक्याबाहेर गेले आहे. त्यामुळे नागरिक कमी किमतीत सेकंड हॅण्ड चारचाकी वाहन खरेदी करण्यास प्राध्यान्य देतात. त्यामुळे जुन्या गाड्यांचा बाजार सध्या जोमात आहे. शहरामध्ये ५० पेक्षा अधिक सेकंड हॅन्ड गाड्यांचे विक्रेते असून दिवसाला २० ते ३० गाड्यांची विक्रीतून २५ ते ३० लाखांपर्यंतची उलाढाल होत असल्याचे वाहन विक्रेते व्यापाऱ्यांनी सांगितले.

सामान्यपणे कार घ्यायची म्हटले की, त्यासाठी मोठी आर्थिक तजवीज करावी लागते. सर्वसामान्य पर्याय म्हणजे नवी कार घेण्याऐवजी चांगल्या स्थितीतील सेकंड हॅन्ड कार घेणे पसंत केले जाते. कारण सेकंड हॅन्ड कार बजेटच्या हिशोबाने परवडणारी असते. म्हणून नव्या कारच्या तुलनेत जुन्या गाड्यांची विक्री सर्वाधिक होत आहे.सेकंड हॅन्ड गाड्यांच्या या मार्केटमध्ये तुम्हाला प्रीमिअम हॅचबॅकपासून ते सेडान आणि स्पोर्ट युटिलिटी व्हेइकल (SUV) सुद्धा स्वस्तात खरेदी करता येतील. किमान १ वर्षापासून ते १० वर्षे जुन्या गाड्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत. गाडीची पूर्ण तपासणी केल्यानंतरच या गाड्या विकल्या जातात. सोबतच, या गाड्या खरेदी करताना फायनान्स सुविधादेखील उपलब्ध करून दिली जातात.

का वाढली मागणी?

कोरोना साथीच्या आजारामुळे सार्वजनिक वाहतूकही या क्षणी बंद झाली, तर काही लोकांना या अशा परिस्थिती स्वत:च्या गाडीने प्रवास करावासा वाटतो. त्यामुळेच सेकंड हॅन्ड गाड्यांची मागणी बऱ्यापैकी वाढली असल्याचे सेकंड हॅन्ड कारचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरAutomobileवाहनcarकार