शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 05:41 IST

एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल, चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल

मुंबई : सरकार पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उद्योगात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री वेगाने वाढण्याची अपेक्षा असून, एकूण विक्रीत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा वाटा अनुक्रमे ५० आणि ७० टक्के असेल, असे एका अहवालात म्हटले आहे.

असोसिएशन ऑफ ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरर्स (एसीएमए) आणि मॅकिन्से यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात प्रवासी किंवा अवजड व्यावसायिक वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची एकूण किंमत कमी होण्याची शक्यता असून, याकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत, एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल आणि अवजड व्यावसायिक वाहनांचा वाटा पाच ते १० टक्के असेल. चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल.

अति घाई टाळा... : इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी करण्यासाठी कठोर प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी कंपन्यांनी अति घाई टाळावी, असे वाहन उद्योगातील दिग्गजांनी म्हटले आहे.

दिग्गज काय म्हणतात...इलेक्ट्रिक वाहने अजूनही विकसित होत आहेत. उत्पादक शिकण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनाला आग लागणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणत्या चाचण्या करायच्या हे देखील अद्याप समजलेले नाही. अशाच घटना १५-२० वर्षांपूर्वी होत होत्या. त्या वेळी आम्हाला काय करावे लागेल हे माहीत नव्हते, असे महिंद्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले.

दुचाकी वाहने १००% इलेक्ट्रिक करा : कांतभारतातील दुचाकी आणि तीनचाकी वाहने पुढील चार वर्षांत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे, असे निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. हरित वाहन क्रांती खरोखरच आपले दार ठोठावत आहे, असे ते म्हणाले.

स्वस्त कार वापरणाऱ्यांचा विचार करा : गडकरीवाहन उत्पादक सहा एअरबॅग असलेल्या कारची निर्यात करत आहेत, त्यांनी भारतातही कारसाठी अशा सुरक्षा नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. लहान स्वस्त कार वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचाही उत्पादकांनी विचार करायला हवा, असे मंत्री गडकरी म्हणाले.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर