शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

OLAच्या मीटिंगमध्ये गोंधळ; मालकाने फाईल फाडली, कर्मचाऱ्यांना Useless म्हटले, नेमकं झालं काय..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2022 14:43 IST

ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची व्यवस्थापन शैली ओला इलेक्ट्रिकसाठी चिंतेचा विषय बनली आहे.

Ola Co-Founder: ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची व्यवस्थापन शैली ओला इलेक्ट्रिकचे व्यवस्थापक आणि बोर्ड सदस्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. नुकत्याच झालेल्या एका मीटिंगमध्ये भाविश अग्रवाल आपल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्याची घटना घडली. तसेच, त्यांनी फाईल फाडून आपल्या टीमला निरुपयोगी(Useless) म्हटले. एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे.

बैठकीत सीईओ भडकलेबिझनेस टुडेने ब्लूमबर्गच्या रिपोर्टच्या हवाल्याने ही माहिती दिली. कंपनीच्या दुचाकी विक्रीत घट झाल्यामुळे सीईओ खूप संतापले. रिपोर्टमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या सुमारे दोन डझन माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. आता ताजे प्रकरण म्हणजे, भाविश अग्रवाल यांची ओला इलेक्ट्रिकच्या टीमसोबतची बैठक झाली. या सभेत त्यांना इतका राग आला की, त्यांनी कर्मचाऱ्यांना सडकून काढले.

पंजाबी भाषेत सुनावले खडे बोलब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मीटिंगदरम्यान प्रेझेंटेशन फाइलमधील एक पेपर गहाळ झाल्यामुळे भाविश अग्रवाल यांनी सर्व पेपर फाडले आणि पंजाबी भाषेत आपल्या टीमला फटकारताना निरुपयोगी म्हटले. साधारणतः तासभर चालणारी बैठक त्यांनी अवघ्या काही मिनिटांत संपवली. कंपनीमध्ये कामाचे वातावरण आता 2013प्रमाणे राहिलेले नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले.

कर्मचाऱ्याला कारखान्याच्या चकरा मारायला लावल्यारिपोर्टनुसार, कंपनीच्या माजी आणि वर्तमान कर्मचार्‍यांनी सांगितले की, भाविश अग्रवाल यांचे वर्तन दिवसेंदिवस उद्धट होत आहे. एका ताज्या प्रकरणात, त्यांनी एका कर्मचाऱ्याला चुकीची मोठी शिक्षा दिली. भाविश अग्रवालने एका कर्मचाऱ्याला कैक एकरमध्ये पसरलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लांटमध्ये तीन फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली. या कर्मचाऱ्याचा दोष एवढाच होता की, त्याने कंपनीचे मुख्य गेट उघडे ठेवले होते. 

टॅग्स :OlaओलाAutomobileवाहन