शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

Navigation App : आता प्रवासापूर्वीच रस्त्यावरील खड्ड्यांची माहिती मिळणार; ड्रायव्हरला मिळतील अनेक अलर्ट, रस्ते मंत्रालयाने लाँच केले नेव्हिगेशन अ‍ॅप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2021 17:14 IST

Road ministry launches navigation app : भारत सरकारच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने IIT मद्रास आणि डिजिटल टेक कंपनी MapmyIndia सोबत सहकार्य केले आहे. या करारांतर्गत वाहनचालकांना रस्ता सुरक्षेसाठी म्हणजेच रस्ता सुरक्षेबाबत सूचना देण्यासाठी भारतात तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तिघांनी एकत्र येऊन एक मोफत वापरता येणारे नेव्हिगेशन अ‍ॅप लाँच केले आहे, जे वाहनचालकांना रस्त्यावरील संभाव्य अपघातांबाबत अलर्टद्वारे सावध करेल. या अ‍ॅपमध्ये अपघात प्रवण क्षेत्रे, स्पीड ब्रेकर्स, तीक्ष्ण वळणं आणि खड्डे यांसह इतर धोक्यांची माहिती वाहनचालकांना ऑडिओ आणि व्हिज्युअलच्या माध्यमातून दिली जाईल.

अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी उचलले पाऊलभारत सरकारच्या रस्ता सुरक्षा उपक्रमांतर्गत, अपघातातील मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. MapmyIndia ने विकसित केलेल्‍या ‘MOVE’ नावाच्या या नेव्हिगेशन सेवा अ‍ॅपने 2020 मध्ये सरकारचे आत्मनिर्भर अ‍ॅप इनोव्हेशन चॅलेंज जिंकले. या सेवेचा वापर नागरिक आणि अधिकारी अपघात, असुरक्षित क्षेत्र, रस्ता आणि रहदारी समस्या नोंदवण्यासाठी आणि प्रसारित करण्यासाठी आणि इतर वापरकर्त्यांना मदत करण्यासाठी करू शकतात.  या अ‍ॅपवरून प्राप्त झालेल्या डेटाचे IIT मद्रास आणि MapmyIndia द्वारे विश्लेषण केले जाईल. त्यानंतर भविष्यात रस्त्यांची स्थिती सुधारण्यासाठी सरकार याचा वापर करेल.

IIT मद्रासच्या संशोधकांनी तयार केलेगेल्या महिन्यात, रस्ते मंत्रालयाने अधिकृतपणे IIT मद्रास येथील संशोधकांनी जागतिक बँकेच्या निधीतून तयार केलेल्या रस्ता सुरक्षा मॉडेलमधील डेटा वापरण्यास सुरुवात केली. 32 पेक्षा जास्त राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश रस्ते सुरक्षित करण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती सुधारण्यासाठी संस्थेच्या विकसित इंटिग्रेटेड रोड अपघात डेटाबेस (IRAD) मॉडेलचा वापर करतील. IIT टीमने 2030 पर्यंत रस्ते अपघातातले मृत्यू 50 टक्क्यांनी कमी करण्यासाठी रोड मॅप विकसित करण्यात मदत करण्यासाठी विविध राज्य सरकारांशी करार केले आहेत.

टॅग्स :Automobileवाहनroad safetyरस्ते सुरक्षाtechnologyतंत्रज्ञान