Car Finance Plan: फक्त ६० हजार रुपयांवर घेऊन जा नवी कोरी सात सीटर कार; एवढा बसेल EMI

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 03:13 PM2022-11-07T15:13:04+5:302022-11-07T15:13:21+5:30

आजकाल अनेकांना कार घेण्याची इच्छा असते, परंतू हाती लाख-दीड लाख डाऊनपेमेंट करण्याएवढे पण पैसे नसतात. यामुळे चारचाकीचे स्वप्न त्यांचे पूर्ण होत नाही.

Renault Triber RXE Car Finance Plan; take home 7 seater MPV on 60000 rs Downpayment, See EMI Options | Car Finance Plan: फक्त ६० हजार रुपयांवर घेऊन जा नवी कोरी सात सीटर कार; एवढा बसेल EMI

Car Finance Plan: फक्त ६० हजार रुपयांवर घेऊन जा नवी कोरी सात सीटर कार; एवढा बसेल EMI

Next

आजकाल अनेकांना कार घेण्याची इच्छा असते, परंतू हाती लाख-दीड लाख डाऊनपेमेंट करण्याएवढे पण पैसे नसतात. यामुळे चारचाकीचे स्वप्न त्यांचे पूर्ण होत नाही. परंतू, अशी एक ऑफर उपलब्ध आहे, जिथे साठ हजार रुपयांचे डाऊनपेमेंट केले तरी सुलभ हप्त्यांवर नवी कोरी MPV सात सीटर कार घरी नेता येते. 

ही कार आहे सर्वात स्वस्त सात सीटर Renault Triber RXE. हे कारचे बेस मॉडेल आहे. परंतू, ते आरामात सहा- साडे सहा लाखांत मिळते. रेनॉल्ट ट्राइबरच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 5,91,800 रुपये (एक्स शोरूम, दिल्ली) आहे. ऑनरोड ही किंमत 6.5 लाखांवर जाते. जर तुम्ही ही कार खरेदी करायला गेलात तर तुम्हाला साडे सहा लाख रुपये कॅश किंवा फायनान्सवर घ्यायला गेलात तर साठ हजार कॅश हवी. 

काही बँका ८ टक्क्यांपासून सुरुवात होणार वाहन कर्ज देतात. साठ हजारांचे डाऊनपेमेंट केले तर 5,95,882 रुपयांचे कर्ज मिळेल. ज्यावर ८ ते १० टक्के व्याज बसेल. डाऊनपेमेंटचे साठ हजार जमा केले की तुम्हाला महिन्याकाठी ११ ते १२ हजार रुपयांचा ईएमआय बसेल. ९.८ टक्क्यानी व्याज दर असल्यास 12,602 रुपये ईएमआय असेल. 

कर्ज घेण्यासाठी तुम्हाला सिबिल स्कोअर चांगला असवा लागणार आहे. नाहीतर व्याज दर जास्त आकारला जातो किंवा कर्ज नाकारले जाते. या MPV मध्ये 999 cc चे तीन सिलेंडर इंजिन आहे. हे इंजिन 7.01 bhp ची पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. यामध्ये ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. 

Web Title: Renault Triber RXE Car Finance Plan; take home 7 seater MPV on 60000 rs Downpayment, See EMI Options

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.