शहरं
Join us  
Trending Stories
1
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र
2
'भारताची अर्थव्यवस्था मृतावस्थेत', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेला राहुल गांधींचे समर्थन, म्हणाले...
3
भयंकर! एम्समधील नर्सच्या दोन मुलांना घरात घुसून जिवंत जाळले, आईचा आक्रोश
4
IND vs ENG : कमनशिबी कॅप्टन! किंग कोहलीनंतर टीम इंडियातील प्रिन्स शुबमन गिलवर आली ही वेळ
5
भारताचा विकास रोखण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांनी भारतीय कंपन्यांवर लादलेल्या निर्बंधांमुळे इराण संतापला
6
अर्ध वर्षं संपलं, पण अर्धं तर बाकी आहे! 'या' सवयी बदला- डिसेंबर २०२५ पर्यंत बदलेल जगणं
7
'आयुष्मान भारत योजना फसवी' मुंबईतील महिलेची सरकारी योजनेवर टीका, सांगितला धक्कादायक अनुभव
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी कारभारावरून अमेरिकेत गोंधळ; राष्ट्रपतींच्या टॅरिफ पॉवरवर न्यायालय आज निर्णय देणार
9
लोकमत इम्पॅक्ट: गणेश मंडळांना मोठा दिलासा, मंडपासाठीच्या खड्ड्यांचा दंड १५ हजारावरुन २ हजारावर  
10
मालेगाव बॉम्ब स्फोट: "तपास यंत्रणा शंकेपलीकडे आरोप सिद्ध करू शकत नसतील, तर..."; खासदार देसाई काय बोलले?
11
August Horoscope 2025: ऑगस्टमध्ये 'या' ६ राशींच्या वाट्याला येणार राजसी थाट; बाकी राशींचे काय?
12
हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 
13
पाकिस्तानशी मोठी डील करून डोनाल्ड ट्रम्प यांचा दुहेरी निशाणा; भारतासह चीनलाही दिला संदेश?
14
औषधांचा साठा संपला, उपकरणांमध्येही बिघाड; कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील रुग्णांचे हाल!
15
बाजारात मोठी घसरण! निफ्टी अडीच टक्क्यांहून अधिक खाली, अदानी-टाटांना सर्वाधिक फटका
16
२५% टॅरिफवर भडकले भारतीय व्यावसायिक; कोणी दिला ट्रम्प यांना अमेरिकन सामानावर बहिष्काराचा इशारा?
17
IPL 2026: केएल राहुल बनणार कर्णधार, २५ कोटीही मिळणार? 'या' संघाबद्दल रंगलीये चर्चा
18
मालेगाव बॉम्ब स्फोट: निकालावर सरसंघचालक भागवत यांनी तीन शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले...
19
व्हॉट्सअपवरील विनाकामाचे फोटो अन् व्हिडिओंनी भरला फोन, ही ट्रिक वापरून पहा; गॅलरी रिकामी राहील
20
अंतराळ क्षेत्रात एन्ट्री करण्याच्या तयारीत मुकेश अंबानींची रिलायन्स; 'या' कंपनीत मोठी गुंतवणूक करणार

Renault Car Offers: या तीन स्वस्त गाड्या आता मिळतील आणखी स्वस्त, थेट 50 हजारांचा फरक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2022 14:52 IST

Renault October Discount : ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.

जर आपण दिवाळीच्या मूहुर्तावर नवी गाडी घेण्याचा विचार करत असाल, मात्र बजेटमध्ये थोडी-फार समस्या असेल, तर काळजी करण्याचे कारण नाही. कारण, कार निर्माता कंपनी रेनो (Renault) आपल्या Kwid, Triber आणि Kiger या तीन स्वस्त गाड्यांवर मोठी सूट ऑफर करत आहे. या ऑफर अंतर्गत आपण कंपनीची कार 50 हजार रुपयांपर्यंत स्वस्तात खरेदी करू शकता. मात्र, ही ऑफर केवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंतच लागू आहे. या डिस्काउंट ऑफरमध्ये रोख सूट, एक्सचेन्ज बोनस आणि कॉर्पोरेट सूटचा समावेश आहे.

Renault Kwid डिस्काउंट -ही कंपनीची सर्वात स्वस्त कार आहे. या कारवर ऑक्टोबर महिन्यात एकूण 35,000 रुपयांची सूट मिळत आहे. यात 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. रेनो क्विडची किंमत 4.64 लाख रुपयांपासून ते 5.99 लाख रुपयांपर्यंत जाते.

Renault Triber डिस्काउंट -Renault Triber ही भारतातील एकमेव सब-4 मिटर MPV आहे. ऑक्टोबर महिन्यात कंपनी या गाडीवर एकूण 50,000 रुपयांची सूट देत आहे. यात 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेन्ज बोनस आणि 10,000 रुपयांच्या कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. रेनो ट्राइबरची किंमत 5.92 लाख रुपयांपासून ते 8.51 लाख रुपयांपर्यंत जाते. 

Renault Kiger डिस्काउंट -ही कंपनीची सब-4 मिटर SUV आहे. रेनो किगरवर केवळ कॉरपोरेट डिस्काउंटच्या स्वरुपात 10,000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. रेनो किगरची किंमत 5.99 लाख रुपयांपासून ते 10.62 लाख रुपयांपर्यंत जाते. हिचा सामना किआ सॉनेट, निसान मॅग्नाइट आणि मारुती ब्रेझा सारख्या कार सोबत आहे.

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारAutomobileवाहन