शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
3
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
4
ट्रम्प आणि मोदी : ‘जुळवून’ घेण्यासाठी दिल्लीत हालचाली
5
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
6
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
7
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
8
निवडणूक आयोगाचा धादांत खोटेपणा उघडकीस!
9
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
10
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
11
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
12
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
13
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
14
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
15
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
16
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
17
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
18
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
19
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
20
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...

Triber, Kwid आणि Kiger खरेदीवर मिळतोय 50 हजारांपर्यंत डिस्काउंट; जाणून घ्या, सविस्तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2022 12:08 IST

Renault Car Discount December 2022 : रेनॉल्ट ट्रायबर (Triber), रेनॉल्ट क्विड (Kwid)आणि रेनॉल्ट कायगर (Kiger) या तीन गाड्यांवर कंपनीने डिस्काउंट जारी केला आहे.

नवी दिल्ली : रेनॉल्ट इंडियाने (Renault India) वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबर 2022 मध्ये आपल्या विद्यमान कारवर आकर्षक सवलत जारी केली आहे, ज्यामध्ये कंपनी ग्राहकांना 50,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स देत आहे. रेनॉल्ट ट्रायबर (Triber), रेनॉल्ट क्विड (Kwid)आणि रेनॉल्ट कायगर (Kiger) या तीन गाड्यांवर कंपनीने डिस्काउंट जारी केला आहे.

रेनॉल्ट डिसेंबरच्या कार डिस्काउंटमध्ये (Renault December Car Discount) कंपनी 50 हजारांपर्यंत डिस्काउंट देत आहे, त्यात कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंटचाही समावेश करण्यात आला आहे. रेनॉल्ट कार डिस्काउंटची वैध तारीख 31 डिसेंबर 2022 आहे, परंतु ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकवर अवलंबून, कंपनी हा डिस्काउंट ऑफर पुढे सुरू ठेवू शकते. डिस्काउंट ऑफरचे डिटेल्स जाणून घेतल्यानंतर, रेनॉल्टची कोणती कार खरेदी करण्यावर किती डिस्काउंट मिळणार आहे, याबद्दल तुम्ही जाणून घेऊ शकता.

Renault Triber December Discountरेनॉल्ट ट्रायबर ही आपल्या सेगमेंटमधील सर्वात कमी किमतीच्या एमपीव्हीपैकी एक आहे. या कारवर कंपनी डिसेंबर महिन्यात खरेदीवर 50,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे. या कारवर15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 25,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट दिला जात आहे. याशिवाय, कंपनी या एमपीव्हीवर ग्रामीण भागात सूटही देत ​​आहे. ज्यामध्ये शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच झालेल्या व्यक्तीसाठी या एमपीव्हीवर 5 हजार रुपयांची सवलत दिली जात आहे. कंपनीद्वारे चालवल्या जाणार्‍या रिलीव्ह स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत, कंपनी 10,000 रुपयांची अतिरिक्त डिस्काउंट देखील देत आहे.

Renault Kwid December Discountरेनॉल्ट क्विड ही आपल्या सेगमेंटमधील एक स्टायलिश आणि कमी-बजेट कार आहे. या कारवर डिसेंबरमध्ये 35,000  रुपयांपर्यंत लाभ मिळू शकतो. या डिस्काउंटमध्ये 10,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जात आहे. यासोबतच 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट देखील सामील करण्यात आला आहे. या डिस्काउंट व्यतिरिक्त, या रेनॉल्ट कारवर 5,000 रुपयांपर्यंतचा ग्रामीण लाभ दिला जात आहे. कंपनी आपल्या रिलीव्ह स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतची सूट देखील देत आहे.

Renault Kiger December Discountरेनॉल्ट कायगर ही आपल्या सेगमेंटमधील कमी किमतीची एक लोकप्रिय कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे. जी आपल्या डिझाइनसाठी आणि किंमतीसाठी लोकप्रिय आहे. कंपनी डिसेंबरमध्ये या कॉम्पॅक्ट एसयूव्हीच्या खरेदीवर 35,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट देत आहे, परंतु या डिस्काउंटमध्ये कॅश डिस्काउंट दिला जात नाही. रेनॉल्ट कायगरवरील डिस्काउंटमध्ये 15,000 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस आणि 10,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट, कंपनीच्या रिलीव्ह स्क्रॅपेज प्रोग्राम अंतर्गत 10,000 रुपयांपर्यंतच्या बेनिफिट्सचा समावेश आहे.

अधिक माहितीसाठी रेनॉल्ट डीलरशिपला भेट द्या...दरम्यान, रेनॉल्ट कारवर मिळत असलेला डिस्काउंट राज्यानुसार बदलू शकतो, त्यामुळे डिस्काउंटसह कोणतीही कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता किंवा या डिस्काउंटच्या ऑफरची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुमच्या जवळच्या रेनॉल्ट डीलरशिपला भेट देऊ शकता.

टॅग्स :Renaultरेनॉल्टcarकारAutomobileवाहन