शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

सिंगल चार्जवर 200Km रेंज...20 मिनिटांत फुल्ल चार्ज! 8 वर्षांच्या वॉरंटीसह EV बाईक लॉन्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2024 21:01 IST

Raptee.HV T30: या मेड इन इंडिया बाईकमध्ये कंपनीने EV कारचे तंत्रज्ञान वापरले आहे.

Raptee HV T30 Electric Bike: चेन्नईस्थित इलेक्ट्रिक स्टार्टअप Raptee.HV ने आज अधिकृतपणे आपली पहिली हाय-व्होल्टेज इलेक्ट्रिक मोटरसायकल देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी लॉन्च केली. कंपनीच्या माहितीनुसार, या इलेक्ट्रिक बाईकच्या डिझाइनमध्ये जगभरातील इलेक्ट्रिक कारसाठी जे तंत्रज्ञान वापरले जाते, त्याचा वापर करण्यात आला आहे. ही बाईक मोटारसायकल मार्केटमध्ये 250-300 cc ICE (पेट्रोल) बाईकशी टक्कर देण्यास सक्षम असल्याचा दावाही कंपनीने केला आहे. 

किंमत काय ?कंपनीने ही बाईक 2.39 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च केली आहे. पांढरा, लाल, राखाडी आणि काळा अशा चार वेगवेगळ्या रंगांमध्ये ही बाईक उपलब्ध असेल. सर्व रंग प्रकारांची किंमत एकसारखी आहे. कंपनीने त्याचे अधिकृत बुकिंगही सुरू केले आहे. तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटद्वारे 1,000 रुपयांमध्ये बाईक बुक करू शकता. कंपनी पुढच्या वर्षी जानेवारीपासून पहिल्या टप्प्याची डिलिव्हरी सुरू करेल. सुरुवातीला बंगळुरू आणि चेन्नईमध्ये बाईक डिलिव्हर केली जाईल, त्यानंतर इतर 10 शहरांमध्येही याची डिलिव्हरी सुरू होईल.

बाइक कशी आहे?हाय-व्होल्टेज (HV) तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही बाईक देशातील पहिली मॉडेल आहे, जी युनिव्हर्सल चार्जिंग सिस्टमसह येते. याचा वापर इलेक्ट्रिक कारमध्ये होतो. ही बाईक ऑनबोर्ड चार्जरसह येते, जी देशभरातील CCS2 कार चार्जिंग स्टेशनवर देखील उपलब्ध आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, सध्या त्यांची संख्या 13,500 युनिट्स आहे आणि येत्या काळात ती दुप्पट होईल.

लूक आणि डिझाइनच्या बाबतीत ही स्पोर्ट्स बाइकसारखीच आहे. बाईकचा बराचसा भाग कव्हर केलेला आहे आणि स्टायलिश एलईडी हेडलाइटसह त्यात टचस्क्रीन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरदेखील दिले आहे. यामध्ये बाइकचा वेग, बॅटरी हेल्थ, वेळ, स्टँड, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, जीपीएस नेव्हिगेशन यासारखी माहिती मिळते. स्प्लिट सीटसह येणाऱ्या या बाईकमध्ये मागील बाजूस ग्रॅब हँडल्स देखील आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्सया बाईकमध्ये कंपनीने 5.4kWh क्षमतेची 240 व्होल्ट बॅटरी दिली आहे. जी एका चार्जमध्ये 200 किमीच्या रेंज देते. कंपनीचा दावा आहे की, ऑन रोड ही बाईक पूर्ण चार्जवर किमान 150 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. या बाईकची इलेक्ट्रिक मोटर 22kW ची पीक पॉवर जनरेट करते, जी 30 BHP पॉवर आणि 70 न्यूटन मीटर टॉर्कच्या समतुल्य आहे. पिकअपच्या बाबतीतही ही बाईक उत्कृष्ट आहे. Raptee.HV फक्त 3.6 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याचा टॉप स्पीड ताशी 135 किमी आहे. या बाईकमध्ये तीन वेगवेगळ्या राइडिंग मोड आहेत, ज्यात इकोनॉमी, पॉवर आणि स्प्रिंटचा समावेश आहे.

चार्जिंग Raptee.HV सह कंपनी सर्व प्रकारचे चार्जिंग पर्याय देत आहे. सामान्य घरगुती सॉकेटशी कनेक्ट करून ही चार्ज केली जाऊ शकते. याशिवाय त्याची बॅटरी चार्जिंग स्टेशनवर फास्ट चार्जरच्या मदतीने देखील चार्ज करता येते. कंपनीचा दावा आहे की, या इलेक्ट्रिक मोटरसायकलची बॅटरी केवळ 40 मिनिटांत 20% ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. याशिवाय, फास्ट चार्जरने केवळ 20 मिनिटांत बॅटरी इतकी चार्ज केली जाऊ शकते की, तुम्हाला किमान 50 किमीची रेंज मिळेल. घरातील चार्जरने त्याची बॅटरी 1 तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते.

सुरक्षा आणि गॅरंटीकंपनीने Raptee.HV मध्ये IP67 रेटेड बॅटरी पॅक वापरला आहे. हा धूळ, सूर्यप्रकाश आणि पाण्यापासून पूर्णपणे संरक्षित आहे. कंपनी या बाईकच्या बॅटरीवर 8 वर्षांपर्यंत किंवा 80,000 किमीपर्यंतची वॉरंटी देत ​​आहे. या बाईकमध्ये अत्याधुनिक सॉफ्टवेअर देण्यात आले आहे, जे राइडिंग अनुभव सुधारण्यास मदत करतात. सुरक्षेसाठी यात समोर 320 mm डिस्क ब्रेक आणि मागील बाजूस 230 mm डिस्क ब्रेक आहे. हे ड्युअल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) ने सुसज्ज आहेत. याशिवाय बाइकच्या पुढच्या भागात 37 मिमी अप-साइड डाऊन (USD) फोर्क सस्पेन्शन आणि मागील भागात मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आले आहेत.

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर