शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी महापुरावेळी जीप वापरली; आता मॉडिफाय केल्याचे चलन फाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 15:18 IST

मोटार वाहन कायद्यांतर्गत महिंद्रा जीपवर 3000 रुपयांचे चलन करण्यात आले.

देशभरात कोणतीही कार किंवा बाईक मॉडिफाय करणे बेकायदेशीर आहे. कंपन्या कार बनविल्यानंतर त्या आरटीओकडून संमती मिळवितात. यासाठी भारतातील नियमांनुसारच कार बनविल्या जातात. मात्र, अनेकजण त्या कार घेतल्यानंतर बदल करतात. हे बदल बऱ्याचदा धोकादायक असतात. 

दिल्ली पोलिसांनी नुकतेच एका हार्ले डेव्हिडसनच्या मोटारसायकलवर दंड आकारला होता. ही सुपर बाईक कंपनीनेच भारतात स्पीकरसह लाँच केलेली होती. यामुळे ही बाईक भारतीय नियमांनुसार परवानगी मिळाल्यानंतरच लाँच करण्यात आली होती. केरळमध्ये आणखी एक मजेशीर किस्सा घडला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 2012 मध्ये कारच्या काचेवर काळी फिल्म लावणे बेकायदेशीर ठरविले होते. 

केरळमध्ये महापूर आला तेव्हा केरळच्या पोलिसांनी मॉडिफाय केलेल्या जीपद्वारे त्या भागात लोकांना वाचविण्याचे काम केले होते. मात्र, याच पोलिसांनी आता या जीपच्या चालकाला थांबवून मॉडिफिकेशन केल्याविरोधात पावती फाडली आहे. यामुळे हा जीपचालक संतापला होता. 

मोटार वाहन कायद्यांतर्गत महिंद्रा जीपवर 3000 रुपयांचे चलन करण्यात आले. सध्याच्या नव्या नियमांचा या दंडाशी काही संबंध नाही. या जीपच्या खिडकीच्या काचांवर फिल्म लावण्यात आली होती, तर वर आणि विंडशील्डच्या खाली एलईडी लाईट लावण्यात आली होती. कायद्यानुसार वाहनाच्या ठरावीक उंचीपेक्षा जास्त वर हेडलाईट लावता येत नाहीत. कारण ते डोळ्यात जातात. खासकरून शहरात बंधने आहेत. कार फॅक्ट्री फिटेड असेल तरच या लाईटना परवानगी असते, किंवा आरटीओद्वारा परवानगी असलेल्या बदलांनाच परवानगी मिळते. निर्भया बलात्कारानंतर न्यायालयाने काचांवर फिल्म लावणे बेकायदा ठरविले होते. 

टॅग्स :JeepजीपMahindraमहिंद्राroad safetyरस्ते सुरक्षाKerala Floodsकेरळ पूरKeralaकेरळ