शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेलची सुद्धा एक्‍सपायरी डेट असते का? जाणून घ्या, किती दिवस कार उभी राहिली तर खराब होऊ शकते पेट्रोल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 14:45 IST

petrol diesel expiry date : पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते, त्यावेळी कच्चे तेल रिफाइन करताना अनेक केमिकल्स मिसळली जातात.

नवी दिल्ली : जेव्हा आपण दुकानातून एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा त्या वस्तूच्याकिंमतीसह आपण सर्वजण एक गोष्ट पाहतो, ती म्हणजे एक्सपायरी डेट. पण तुम्ही कधी विचार केला आहे, पेट्रोलचीही एक्‍सपायरी  डेट असते असा?... पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि सतत वाढणाऱ्या ट्रॅफिक जॅममध्ये आपण अनेकदा आपली कार बराच वेळ पार्क करून ठेवतो. काही वेळा कारची टाकी काही आठवडे किंवा महिने पेट्रोलने भरलेली असते. कारच्या टाकीत भरलेले पेट्रोल खराब आहे का? तर होय, तर किती दिवसात? चला जाणून घेऊया याचे उत्तर...

पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते, त्यावेळी कच्चे तेल रिफाइन करताना अनेक केमिकल्स मिसळली जातात. यापैकी एक केमिकल इथेनॉल देखील आहे. या केमिकल्समुळे पेट्रोल आणि डिझेलची शेल्फ लाइफ कमी होते. भारतातही सध्या मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून विकले जात आहे. तुम्ही कार दीर्घकाळ पार्क करून ठेवल्यास त्यातील पेट्रोलचे केमिकल्स तापमानासोबत वाफेत रूपांतर होते. जेव्हा केमिकल्सला बाहेर येण्याची संधी मिळत नाही, तेव्हा पेट्रोल आणि डिझेल खराब होऊ लागते.

पार्क केलेल्या कारमध्ये भरलेले पेट्रोल किती दिवसात खराब होईल, ते तेथील तापमानावर अवलंबून असते. तापमान जितके जास्त असेल तितक्या लवकर डिझेल-पेट्रोल खराब होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुमची कार कडक उन्हाळ्यात 1 महिना सतत पार्क केली असेल तर त्या वेळी तेल खराब होऊ शकते.

एका रिपोर्टनुसार, सीलबंद कंटेनरमध्ये पेट्रोल वर्षभर साठवता येते. तर कारच्या टाकीमध्ये ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानात 6 महिने खराब होणार नाही. दुसरीकडे, जर तापमान 30 डिग्री सेल्सिअस असेल तर तीन महिन्यांनंतर ते खराब होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार जास्त वेळ उभी ठेवत असाल तर काही वेळाने कार चालवत राहणे चांगले ठरू शकेल. 

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेलAutomobileवाहन