शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Electric Vehicle: यंदा तब्बल दहा लाख ई-वाहनांची विक्री होणार; दुचाकी खरेदीला मिळतोय मोठा प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2022 07:40 IST

सध्या ई-वाहनांच्या विक्रीला एवढी गती मिळाली आहे की, मागील १५ वर्षांत जेवढी इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तेवढी इलेक्ट्रिक वाहने एकट्या २०२२ मध्येच विकली जातील.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : यंदा भारतात सुमारे दहा लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होण्याची शक्यता असून हा आकडा मागील १५ वर्षांत विकण्यात आलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या एकूण संख्येएवढा आहे, असे इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपन्यांची शिखर संस्था ‘सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चर्स ऑफ  इलेक्ट्रिक व्हेइकल्स’ने (एसएमईव्ही) म्हटले आहे. 

‘एसएमईव्ही’ने जारी केलेल्या एका निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. संस्थेने म्हटले आहे की, २०२१ मध्ये देशातील इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची विक्री दुपटीने वाढून २,३३,९७१ झाली. २०२० मध्ये १,००,७३६ इलेक्ट्रिक दुचाकी वाहने विकली गेली होती.  ‘एसएमईव्ही’चे महासंचालक सोहिंदर गिल यांनी सांगितले की, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत मागील काही महिने खूपच चांगले राहिले आहेत. इलेक्ट्रिक दुचाकी, तीनचाकी वाहने, इलेक्ट्रिक कार व ई-बस यांची मागील १५ वर्षांतील विक्री दहा लाख इतकी होती. 

ही आहेत विक्री वाढण्याची कारणे nगिल यांनी सांगितले की, ई-वाहनांचे अनेक फायदे आहेत. यांच्या किमती पारंपरिक वाहनांच्या तुलनेत अधिक आकर्षक आहेत. त्यांचा खर्च कमी आहे. nत्यांची देखभाल दुरुस्ती यावर होणारा खर्चही कमी आहे. अशा असंख्य कारणांमुळे खरेदीदार ई-वाहनांकडे आकर्षित होताना दिसत आहेत. विशेषत: इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या खरेदीला मोठे बळ ग्राहकांकडून मिळत आहे.

सध्या ई-वाहनांच्या विक्रीला एवढी गती मिळाली आहे की, मागील १५ वर्षांत जेवढी इलेक्ट्रिक वाहने विकली गेली होती, तेवढी इलेक्ट्रिक वाहने एकट्या २०२२ मध्येच विकली जातील, अशी आम्हाला अपेक्षा आहे.  

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर