शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
5
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
6
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
7
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
8
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
9
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
10
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
11
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
12
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
13
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
14
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
15
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
16
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
17
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
18
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
19
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
20
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?

ओलाचा बैल केला, शेतीला जुंपला! ईलेक्ट्रीक स्कूटरने ३० एकर शेत नांगरले; शेतकरी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 09:19 IST

Ola S1 scooter Use For Farming news: खरेतर आज गावा गावात शेतकामाला माणसेच मिळेनासी झाली आहेत. बैल देखील परवडत नाहीत. यामुळे तुम्ही काही आठवड्यांपूर्वी वृद्ध शेतकरी जोडप्याचा बैलाच्या जागी जुंपलेला व्हिडीओ पाहिला असेल.

ओला कंपनीची ईलेक्ट्रीक स्कूटर किती बहुउपयोगी आहे हे त्यांच्या मालकालाही म्हणजेच भाविश अग्रवालनाही माहिती नसेल. एवढा वेगवेगळ्या कारणांसाठी या स्कूटरचा वापर हुशार लोकांनी केला आहे. आधीच पेट्रोलवरील पैसे वाचवून या लोकांनी ईलेक्ट्रीक स्कूटर घेत डोके लढविले होते. त्यात आता या ओलाच्या स्कूटरला नांगराला जुंपून शेतीही करवून घेतली जात आहे. 

खरेतर आज गावा गावात शेतकामाला माणसेच मिळेनासी झाली आहेत. बैल देखील परवडत नाहीत. यामुळे तुम्ही काही आठवड्यांपूर्वी वृद्ध शेतकरी जोडप्याचा बैलाच्या जागी जुंपलेला व्हिडीओ पाहिला असेल. कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यात एका शेतकऱ्याने यावर वेगळीच शक्कल लढविली आहे. यामुळे त्याचा शेतीसाठीचा खर्चही कमी झाला आहे. 

लावलेल्या रोपांमधून नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्याने बैल म्हणून चक्क ओलाची ईलेक्ट्रीक स्कूटर वापरली आहे. जवळपास ३० एकर शेती हा शेतकऱ्याचा पोरगा त्याच्या वडिलांसोबत ओलाच्या स्कूटरने नांगरतो. चिक्कोडी तालुक्यात राहणाऱ्या अजित भिमप्पा यांनी अशाप्रकारे शेत नांगरले आहे. अजित भिमप्पा यांच्या नुसार त्यांना शेती करण्यासाठी बैल मिळत नव्हते. सोयाबीनची शेतात लागवड करण्यात आली आहे. यामुळे आम्ही हा मार्ग निवडल्याचे ते म्हणाले. अजित यांनी कृषी विभागाने दिलेला नांगर ओलाच्या स्कूटरच्या मागे जोडला आहे. त्याद्वारे ते नांगरणी करत आहेत. अजित यांच्या या उपायाचा फायदा आता इतर शेतकऱ्यांनाही होणार आहे. छोट्या ट्रॅक्टरचा खर्च देखील वाचणार आहे. पेट्रोलवरील पैसेही वाचणार आहेत. अजित यांच्या कुटुंबाने एका दिवसात दोन एकर शेती नांगरली आहे. 

टॅग्स :OlaओलाFarmerशेतकरीbelgaonबेळगाव