शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

ओला पेट्रोल स्कूटरला टफ फाईट देणार! गडकरींनी म्हटल्याप्रमाणे स्वस्तात ईव्ही आणणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 15:26 IST

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे.

देशातील सर्वात मोठी इलेक्ट्रीक स्कूटर निर्माता कंपनी पावसाळ्यात पुन्हा एकदा धमाका करणार आहे. पेट्रोल दुचाकी विकणाऱ्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी ओला स्वस्तातली  नवीन स्कूटर आणण्याची तयारी करत आहे. महत्वाचे म्हणजे ही स्कूटर हेल्मेट घातल्याशिवाय चालू होणार नाही, हे फिचर ओलाच्या सर्वच स्कूटरमध्ये येण्याची शक्यता आहे. 

ओला इलेक्ट्रीक नवी स्कूटर आणणार असल्याची माहिती सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिली आहे. सध्या पेट्रोल स्कूटरच्या किंमती ८० ते एक लाखाच्या आसपास आहेत. तर इलेक्ट्रीक स्कूटर त्यापेक्षा २४ ते ५० हजारांनी महाग आहेत. यामुळे पेट्रोल स्कूटरच्या किंमतीत इलेक्ट्रीक स्कूटर आणली तर ग्राहकांसमोर चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे. 

ओला जुलै महिन्यात ही स्कूटर आणू शकते. भाविश यांनी एंड आइस एज शो पार्ट-1 असे नाव दिले आहे. या स्कूटरमध्ये एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल देण्यात येणार आहेत. डिझाईन सारखेच असले तरी नवीन फिचर्स दिले जाऊ शकतात. जुलैतील कार्यक्रमात काही नव्या घोषणाही केल्या जाऊ शकतात. 

सध्या ओलाच्या स्कूटरची किंमत १.१० लाख रुपयांपासून सुरु होते, ते १.४० लाख रुपयांपर्यंत जाते. जून २०२३ पासून फेम २ सबसिडी कमी केल्यानंतर इलेक्ट्रीक स्कूटरच्या किंमती वाढल्या आहेत. यामुळे विक्रीतही घट झाली आहे. 

टॅग्स :Olaओलाelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर