शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

 Ola S1 Pro: ओला इलेक्ट्रीक स्कूटर १४ दिवसांत डिलिव्हर करू; कंपनी नवा शब्द पाळणार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 13:18 IST

गेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. त्यात समस्या एवढ्या की ग्राहक वैतागले, आणि पुढचे सावध झाले.

ओलाच्या इलेक्ट्रीक स्कूटरला मोठी मागणी होती. तेव्हा कंपनी काही ही मागणी वेळेत पूर्ण करू शकली नाही. कारणे काहीही असोत परंतू कंपनीने अनेकांना सदोष स्कूटर दिल्या. यामुळे जे घेणारे ग्राहक होते, त्यांनी देखील पाठ फिरविली आहे. या समस्या दूर केल्याचा दावा करत असतानाचा कंपनीसमोर गंभीर समस्या उभी ठाकली आहे. 

ओलाची स्कूटर पुढील चाकातूनच भर रस्त्यात मोडून पडत आहे. यामुळे स्कूटर चालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. आता कंपनीने Ola S1 Pro ही १४ दिवसांत डिलिव्हर करण्याचा दावा केला आहे. परंतू यातही कंपनीने काही स्पष्ट केलेले नाही. बुकिंग केल्यावर १४ दिवसांत डिलिव्हरी की गाडी कंपनीतून निघाल्यावर १४ दिवसांत डिलिव्हरी मिळेल हे स्पष्ट केलेले नाही. अनेकांना तर आरटीओ रजिस्ट्रेशनचा मेसेज येऊनही १५ दिवस ते महिनाभर स्कूटर घरी न आल्याचा अनुभव आहे. 

Ola Scooter: आधी आगीची घटना, आता झाले दोन तुकडे; Ola Scooter बाबत ग्राहकांचा संताप

कंपनीने १४ दिवसांत डिलिव्हरी करण्याचा काही ग्राहकांना मेसेज केला आहे. या ईमेलमध्ये Ola S1 Pro इलेक्ट्रिक स्कूटरच्या 14 दिवसांच्या गॅरंटीड डिलिव्हरीबद्दल सांगण्यात आले आहे. मात्र, हे 14 दिवस कधीपासून मोजले जाणार हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. गेल्या आठवड्यातच कंपनीने बुकिंग विंडो सुरु केली होती. 

Ola S1 Pro Scooter Problems List: एक दोन नाहीत, ओला एस१ प्रोमध्ये २५ प्रॉब्लेम्स; ग्राहक सांगून सांगून वैतागलेगेल्या वर्षभरात ओलाच्या स्कूटरने जेवढी प्रसिद्धी कमावली तेवढीच गमावलीसुद्धा आहे. ओलाच्या स्कूटरला तुफान प्रतिसाद मिळाला होता, परंतू ग्राहकांना डिलिव्हरी काही होता होत नव्हती. आज देतो, उद्या देतो असे म्हणत अखेर कंपनीने डिसेंबर, जानेवारीला मोजक्या ग्राहकांना स्कूटर देण्यास सुरुवात केली आणि याच मोजक्या ग्राहकांनी ओलाच्या या हायफाय स्कूटरची पिसे काढली. जगातील सर्वात मोठी मागणी नोंदविलेल्या या स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आल्या की ग्राहक सोशल मीडियावर तक्रारी करू लागले. कोणाची स्कूटर आल्या आल्याच बंद पडली, कोणाची सुस्साट मागे धावू लागली, कंपनीने सांगितलेली रेंज कोणालाही मिळाली नाही. 

टॅग्स :Olaओला